Advertisement

'गेम शॉट', डिजिटल स्पोर्ट्सचा नवा अवतार! क्लिक करूनच बघा...

'गेम शॉट' या उपक्रमाच्या माध्यमातून विविध खेळ, टूर्नामेंट्स, सांस्कृतिक कार्यक्रम यांना डिजिटल प्लॅटफाॅर्म उपलब्ध होणार आहे.

'गेम शॉट', डिजिटल स्पोर्ट्सचा नवा अवतार! क्लिक करूनच बघा...
SHARES

आजघडीला खेळ हा प्रत्येकाच्या वैयक्तिक जडणघडणीचा आणि विकासाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट विश्वविजेतेपदाचं स्वप्न साकारून एक दशकाचा कालावधी पूर्ण होत असताना 'गेम शाॅट'ने आधुनिक जगातील खेळाची नवी संकल्पना क्रीडाप्रेमींपुढं आणली आहे. क्रीडाप्रेमी या नव्या संकल्पनेला तितक्या जोशपूर्ण उत्साहात उचलून धरतील, अशी अपेक्षा आहे.    

'गेम शॉट' या संकल्पनेच्या माध्यमातून विविध खेळ, टूर्नामेंट्स, सांस्कृतिक कार्यक्रम यांना डिजिटल प्लॅटफाॅर्म उपलब्ध करून देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या महामारीच्या पार्श्वभूमीवर क्रीडाप्रेमींना घरबसल्या खेळाचा आनंद लुटता यावा, हाच या प्लॅटफाॅर्ममागचा मुख्य उद्देश आहे. शिवाय, या डिजिटल प्लॅटफाॅर्मच्या माध्यमातून देशभरातील स्थानिक खेळ आणि लॉइव्ह स्ट्रिमिंग मार्केट यांनाही चालना मिळणार आहे.

स्थानिक पातळीवरील आयोजकांना अत्यंत सहज पद्धतीने या उपक्रमात सहभागी होऊन मॅच असो वा टुर्नामेंटचं लाइव्ह स्ट्रिमिंग करता यावं, याकरीता एका कॅमेऱ्याच्या सेटअपसाठी केवळ ३५०० रुपयांचा माफक दर ठेवण्यात आला आहे. या माध्यमातून  स्थानिक टॅलेंट, क्रीडा कौशल्य घराघरांत पोहोचून नवोदितांच्या प्रतिभेला मोठा हातभार लागू शकेल.

स्थानिक क्रीडा स्पर्धा आयोजक कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लवकरच सारं काही सुरळीत होण्याची अपेक्षा बाळगून आहेत. अशा स्थितीत 'गेम शॉट' या प्लॅटफाॅर्मचा आयोजकांना पुरेपूर वापर करून घेता येईल. डिजिटल लाइव्ह स्ट्रिमिंगचा हा अनुभव जनसामान्यांत रूळून स्थानिक प्रतिभेला वाव मिळेल, अशी आशा आहे. सद्यस्थितीत Beta stage वर असलेल्या 'गेम शॉट' प्लॅटफाॅर्मला भेट देण्यासाठी www.gameshot.in. इथं क्लिक करा. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा