Advertisement

ए सॅट मिसाइल म्हणजे काय? चला जाणून घेऊया

अवघ्या ३ मिनिटांमध्ये अवकाशातील सॅटेलाइट पाडत आपल्या शास्त्रज्ञांनी एक इतिहासच घडवला आहे. त्यामुळे सर्व स्तरावरून क्षेपणास्त्राची निर्मिती करणाऱ्या डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करण्यात येत आहे.

ए सॅट मिसाइल म्हणजे काय? चला जाणून घेऊया
SHARES

''भारत अंतराळातील महाशक्ती बनला आहे. भारतानं अंतराळात एक लाइव्ह सॅटेलाइट उदध्वस्त केलं, अशी क्षमता प्राप्त करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश बनला'' असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. लो अर्थ ऑरबिट या उपग्रहाला ए सॅट (अँटी सॅटलाईट) क्षेपणास्त्राद्वारे नष्ट करण्यात आलं. अवघ्या ३ मिनिटांमध्ये अवकाशातील सॅटेलाइट पाडत आपल्या शास्त्रज्ञांनी एक इतिहासच घडवला आहे. त्यामुळे सर्व स्तरावरून क्षेपणास्त्राची निर्मिती करणाऱ्या डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करण्यात येत आहे.

मिशन शक्ती हे मिशन यशस्वी झालं. पण या मिशनबद्दलची माहिती क्वचितच कुणाला असावी. लो अर्थ ऑरबिट म्हणजे काय? ते अंतराळात काय काम करतं? नेमकं उपग्रह कसं उद्वस्त केलं जातं? अँटी सॅटलाइट क्षेपणस्त्राची निर्मिती कशी झाली? त्याचा भारताला काय फायदा असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. चला या प्रश्नांची उकल करूया.


'लो अर्थ ऑरबिट' उपग्रह म्हणजे?

'लो अर्थ ऑरबिट' हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून २,००० किलोमीटरपेक्षा कमी अंतराद्वारे चिन्हांकित केला जातो. या उपग्रहाच्या मदतीनं पृथ्वीच्या पृष्ठभागावर म्हणजेच जमिनीवर आणि पाण्यावर लक्ष ठेवता येतं. अशा प्रकारे कोणत्याही देशाच्या कोणत्याही गुप्तचर हालचालींवर लक्ष ठेवलं जातं. भारतावर देखील अनेकदा 'लो अर्थ ऑरबिट' उपग्रहाच्या मदतीनं लक्ष ठेवलं जातं. आता देशासाठी त्रासदायक ठरणारे हे उपग्रह अँटी सॅटलाइटद्वारे पाडता येणार आहेत.


सर्वात आधी चीन यशस्वी

अवकाशात असलेले देशासाठी त्रासदायक ठरणारे उपग्रह पाडण्याची क्षमता आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे होती. आता भारताचा देखील या यादीमध्ये समावेश झाला आहे. चीननं या क्षेत्रात सर्वात पहिल्यांदा आघाडी घेतली. चीननं २००७ साली अँटी सॅटलाइट मिसाइलची निर्मिती केली होती. त्यानंतर अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर २००८ साली अमेरिकेनं अँटी सॅटलाइट मिसाइलची यशस्वी चाचणी केली होती. त्यानंतर २०१७ साली रशियानं अँटी सॅटलाइट मिसाइलची यशस्वी चाचणी केली. त्यानंतर भारताने देखील यश मिळवलं आहे.


अशी काम करते अँटी सॅटलाइट मिसाइल?

अँटी सॅटलाईट मिसाइल पृथ्वीपासून ३०० किलोमीटर अंतरावर असलेला उपग्रह पाडला. ४०० किलोमीटर अंतरावरील उपग्रह पाडण्याची या मिसाइलची क्षमता आहे. एका उपग्रहाला पाडण्यासाठी अँटी सॅटलाइट मिसाइल वेगवान असणं गरजेचं असतं. कारण अवघ्या दीड-दोन तासात उपग्रह पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घालत असतात. त्यामुळेच अँटी सेटलाइट मिसाइलने अचूक वेग घेत उपग्रहावर मारा करण आवश्यक असतं.



हेही वाचा

भारताची अंतराळ 'शक्ती', ३ मिनिटांत पाडला उपग्रह


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा