Advertisement

'का रे दुरावा' फेम सुयश टिळकचा अपघात

मराठी अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) याचा अपघात झाला आहे.

'का रे दुरावा' फेम सुयश टिळकचा अपघात
SHARES

‘का रे दुरावा’ (Ka Re Durava) या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला मराठी अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) याचा अपघात झाला आहे. त्यानं एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली. सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सुयशच्या अपघाताची माहिती चाहत्यांपर्यंत वाऱ्यासारखी पसरली. यानंतर सुयशनं स्वतः पोस्ट करून सुखरूप असल्याची माहिती दिली. 'देव दयाळू आहे व जगात माणुसकी अजूनही जिवंत आहे', अशी पोस्ट करीत सुयशनं काळजी करणाऱ्या सर्व चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

सुयश २८ फेब्रुवारी रोजी आपली गाडी न घेता कॅबनं प्रवास करत होता. तो ज्या कॅबनं प्रवास करत होता तिचाच अपघात झाला आहे. रविवारी पहाटे रस्त्यावर धुकं होतं. अंधार आणि धुकं असल्यामुळं चालकाला समोरुन येणाऱ्या गाड्या व्यवस्थित दिसत नव्हत्या. त्यामुळे समोर येणाऱ्या ट्रकनं सुयशच्या कॅबला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की ज्यामुळं गाडी रस्त्याच्या कडेला उलटून पडली. सुदैवानं चालक आणि सुयश यांपैकी कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

अपघात झाल्यानंतर सुयश स्वतः कॅबबाहेर आला त्यानंतर त्यानं ड्रायव्हरला देखील बाहेर काढलं. या दुर्घटनेत गाडीचं मात्र मोठं नुकसान झालं आहे.हेही वाचा

२०२१ मध्ये नेटफ्लिक्सचा धमाका, दिल्ली क्राईमसह होणार 'या' सिरिज प्रदर्शित

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा