Advertisement

बिग बॉस मराठीच्या घरात 'या' नव्या सदस्याची एन्ट्री

प्रेक्षकांना रविवारच्या भागामध्ये एक सरप्राईझ मिळाले आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात 'या' नव्या सदस्याची एन्ट्री
SHARES

बिग बॉस मराठी हा कार्यक्रम प्रत्येक दिवशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एक सरप्राईझ ( New Wild Card Entry) मिळाले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अजून एका सदस्याची एन्ट्री झाली. सगळ्यांचा लाडका आदिश वैद्य (adish vaidya) वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे घरामध्ये दाखल झाला आहे.

आदिशनं घरातील सदस्य तसंच त्याला कोण आवडतं, कोणाशी मैत्री होईल? याबद्दल देखील थोडं सांगितलं तो म्हणाला, “खूप उत्सुक आहे घरामध्ये जायला. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येकजण आपल्या पध्दतीनं खेळायचा प्रयत्न करत आहे. माझा आवडता सदस्य विकास पाटील आहे. काही बाबतीत मी त्याला रिलेट करू शकतो. जय, विशाल (टास्कच्या बाबतीत) आणि मीनल हे तीन सदस्य स्ट्राँग प्रतिस्पर्धी आहेत असं मला वाटत. वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे घरामध्ये गेलेले स्पर्धक कधी जिंकले नाही पण मी घरामध्ये लवकर जात आहे तर ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे विजेता म्हणूनच मला बाहेर यायला नक्की आवडेल.”

विविध मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये आदिशनं काम केलं आहे. 'गुम है किसीके प्यार में' या हिंदी मालिकेत आदिश सध्या महत्त्वाची भूमिका साकारत होता. मात्र नुकतीच त्यानं या शोमधून एक्झिट घेतल्याचं देखील समोर आल आहे. अदिश नेहमी रेवती लेलेसोबतच्या रिलेशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. दोघेही एकमेंकासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

आदिशच्या अचानक घरामध्ये झालेल्या एंट्रीमुळे आता घरातील रहिवाशी संघाची काय प्रतिक्रिया असेल? घरामध्ये कोणते रंजक वळण येईल? घरातील नाती त्याच्या एंट्रीमुळे बदलणार का? कोणत्या गृपचा आदिश सदस्य होणार? कि तो त्याचा गृप तयार करणार? की स्वत:चा खेळ स्वतंत्रपणे खेळणार? हे बघणं रंजक असणार आहे.


हेही वाचा

बिग बॉस मराठीच्या घरामधून 'हा' सदस्य बाहेर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा