Advertisement

बिग बॉस मराठीच्या घरामधून 'हा' सदस्य बाहेर

बिग बॉसच्या घरातून पहिलं एलिमिनेशन पार पडलं आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामधून 'हा' सदस्य बाहेर
SHARES

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन ३ हे पर्व बरेच चर्चेमध्ये आहे. बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. त्यानुसार या आठवड्यात अक्षय वाघमारे घराबाहेर पडला आहे.

या आठवड्यामध्ये सुरेखा कुडची, अक्षय वाघमारे, संतोष चौधरी (दादुस), विशाल निकम, तृप्ती देसाई आणि स्नेहा वाघ हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले होते. सुरुवातीला दादूस आणि तृप्ती देसाई सुरक्षित आहे.  शेवटी सुरेखा कुडची आणि अक्षय वाघमारे हे डेंजर झोन मध्ये होते. महेश मांजरेकर यांनी घोषित केलं की, या आठवड्यामध्ये अक्षय वाघमारेला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावं लागले.

अक्षय वाघमारे बाहेर झाणार हे कळताच घरातील प्रत्येक सदस्याला अश्रु अनावर झाले. पण यासोबतच बिग बॉसच्या घरात आणखी एका नव्या सदस्याची एन्ट्री झाली आहे. आता हा नवीन सदस्य घरातल्यांना हसवतो की रडवतो हे येत्या काळात कळेलच.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा