Advertisement

शेवंता पुन्हा येणार! प्रेक्षकांची उत्सुक्ता शिगेला

आता शेवंताला पाहण्याची सर्व प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला लागली आहे. लवकरच प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होणार आहे.

शेवंता पुन्हा येणार! प्रेक्षकांची उत्सुक्ता शिगेला
SHARES

झी मराठी वाहिनीवर लोकप्रिय ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सुरू होऊन काही दिवस उलटले आहेत. पहिल्या भागात अण्णांची झलक प्रेक्षकांनी पाहिली. आता शेवंताला पाहण्याची सर्व प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला लागली आहे. लवकरच प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होणार आहे.

शेवंता कधी भेटीला येणार हे झी मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सांगण्यात आलं आहे. शेवंताच्या डोळ्यांचा एक फोटो झी मराठीनं शेअर केला आहे. यात ती कधी येणार? हे सांगण्यात आलं आहे. हा फोटो जर तुम्ही निरखूवन पाहिलात तरच तुम्हाला शेवंता कधी येणार हे जाणून घेता येणार आहे.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये झी मराठीनं म्हंटलं आहे. शेवंता येणार पण कधी ते जाणून घेण्यासाठी फोनचा brightness वाढवा. तर तुम्हाला फोनचा ब्राईटलेस वाढवल्यावर कळेल शेवंता कधी येत आहे. पण फोटो पाहून शेवंताच्या अनेक फॅन्सचा हिरमोड झाला असेल. कारण या फोटोतून एप्रिल फूल बनवण्यात आलं असल्यामुळे प्रेक्षकांना शेवंता येण्याचा नेमका दिवस अजून कळालेला नाही.

पण मिळालेल्या माहितीनुसार, शेवंता लवकरच चाहत्यांच्या भेटीला या मालिकेतून येणार आहे. कारण शेवंतानंच म्हणजेच अपूर्वा नेमळेकरनं तिच्या इन्स्टाग्रामवरून चाहत्यांना ती येत असल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर मालिकेमध्ये शेवंताची एक झलकही चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. शेवंता पांडूला आरश्यामध्ये दिसल्यामुळे लवकरच येत्या भागात शेवंता प्रत्यक्ष भेटीला येणार आहे.



हेही वाचा

अभिनेत्री आलिया भट्टला कोरोनाची लागण

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा