Advertisement

अभिनेत्री शगुफ्ता अलींच्या मदतीला धावून आला रोहित शेट्टी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ससुराल सिमर का’, ‘पुनर्विवाह’, ‘एक वीर की अरदास वीरा’ आणि ‘मधुबाला’मध्ये काम करणारी अभिनेत्री शगुफ्ता अली या सध्या चर्चेत आहे.

अभिनेत्री शगुफ्ता अलींच्या मदतीला धावून आला रोहित शेट्टी
SHARES

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ससुराल सिमर का’, ‘पुनर्विवाह’, ‘एक वीर की अरदास वीरा’ आणि ‘मधुबाला’मध्ये काम करणारी अभिनेत्री शगुफ्ता अली या सध्या चर्चेत आहे. शगुफ्ता यांना सध्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेत काम करणाऱ्या नीना गुप्ता, अभिनेता सुमित राघवन आणि ‘सावधान इंडिया’ या मालिकेतील अभिनेता सुशांत सिंह यांनी शगुफ्ता यांना मदत केल्याचं म्हटलं जात आहे. तसंच बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट निर्माता रोहित शेट्टीनेदेखील मदतीचा हात पुढे केला आहे.

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, अशोक पंडित यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘शगुफ्ता यांच्या आर्थिक अडचणीविषयी माहिती मिळताच मी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांची कशा प्रकारे मदत करता येईल हे विचारले. त्यांचे संपूर्ण बोलणे ऐकल्यानंतर मी रोहित शेट्टीशी बोललो. त्यानंतर त्यानं शगुफ्ता यांना मदत करण्याचा निर्णय घेतला’ असं अशोक पंडित म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ‘रोहित शेट्टीनं शगुफ्ता यांना आर्थिक मदत केली आहे. आम्ही सर्वजण त्यांचे आभार मानतो. इंडस्ट्रीमधील आणखी काही लोकांकडे मदतीसाठी विनंती केली आहे. रोहित शेट्टीनं मदत केल्यानंतर शगुफ्ता यांनी त्याचे आभार मानले आहेत. त्या म्हणाला, मी स्वत:ला भाग्यवान समजेन की रोहितनं माझी मदत केली.’

शगुफ्ता गेल्या ३६ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी जवळपास १५ चित्रपट आणि २० मालिकांमध्ये काम केलं आहे. आज त्याच शगुफ्ता आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. एवढंच नाही तर त्यात भर म्हणजे त्या आजारी आहेत. त्यांनी ‘मेहंदी’, ‘हीरो नंबर १’ आणि ‘अजुबा’ सारख्या चित्रपटात काम केलं आहे.



हेही वाचा

सलमान खान आणि त्याच्या बहिणीवर फसवणुकीचा आरोप, पोलिसांनी पाठवलं समन्स

शगुफ्ता अली गेल्या ४ वर्षांपासून बेरोजगार, चाहत्यांकडे मागितली मदत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा