Advertisement

सलमान खान आणि त्याच्या बहिणीवर फसवणुकीचा आरोप, पोलिसांनी पाठवलं समन्स

बॉलीवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान, त्याची बहिण अलवीरा खान आणि त्याची कंपनी ‘बीइंग ह्युमन’ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सलमान खान आणि त्याच्या बहिणीवर फसवणुकीचा आरोप, पोलिसांनी पाठवलं समन्स
SHARES

बॉलीवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान, त्याची बहिण अलवीरा खान आणि त्याची कंपनी ‘बीइंग ह्युमन’ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात चंदीगडमधील एका व्यापाऱ्यानं आर्थिक फसवणुकीचा आरोप केला आहे.

चंदीगड पोलिसांनी व्यापाऱ्याच्या तक्रारीची दखल घेत, सलमानसह सर्वांना समन्स बजावले असून दहा दिवसांत उत्तर देण्यास सांगितलं आहे.

अरूण गुप्ता असं सलमान आणि त्याच्या बहिणीविरोधात तक्रार करणाऱ्या या व्यापाऱ्याचं नाव आहे. चंदीगडमध्ये त्यांनी ‘बीइंग ह्युमन’चे एक शोरूम उघडले होते. आपली याच व्यवहारात फसवणूक झाल्याचा आरोप गुप्ता यांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सलमान खान, अलवीरा खान, बीइंग ह्युमन कंपनीचा सीईओ प्रसाद कपारे, संतोष श्रीवास्तव, संध्या, अनुप, संजय मानव आणि आलोक यांना समन्स बजावला आहे.

तक्रारीनुसार, अरूण गुप्ता यांनी चंदीगडमध्ये बीइंग ह्युमनचे एक शोरूम उघडले होते. त्यांनी ३ कोटी रूपये या शोरूमवर खर्च केले आहेत. शो रूमसाठी स्टाइल क्विंटेट जुलरी प्राय. लिमिटेडशी करारही केला. शोरूम तर उघडले, पण या शोरूमसाठी लागणारे सामान त्यांना मिळाले नाही. ज्या स्टोरमधून बीइंग ह्युमनची ज्वेलरी मिळणार होती, ते सुद्धा बंद आहे. या प्रकरणी अरूण गुप्ता यांनी बीइंग ह्युमनकडे अनेकदा तक्रार केली.

परंतु त्यांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर त्यांनी सलमान, त्याची बहिण अर्पिता आणि बिंग ह्युमन कंपनीविरोधात आर्थिक फसवणूकीची तक्रार दाखल केली. त्यांनी पुरावा म्हणून कंपनीसोबत केलेल्या लिखित कराराची कॉपी देखील जोडली आहे.

अरूण गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानचे ते खूप मोठे फॅन आहेत. त्यांनी सलमानवर विश्वास ठेवूनच गुंतवणूक केली होती. शोरुमच्या ओपनिंगसाठी स्वत: सलमान येणार होता. परंतु ऐनवेळी त्यानं त्याचा मेहुणा आयुष शर्माला पाठवलं होतं.



हेही वाचा

‘मिशन इम्पॉसिबल’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार तापसी पन्नू

‘टकाटक 2’चे शूटिंग पूर्ण, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा