Advertisement

Year End 2020 : २०२० मध्ये 'या' टीव्ही कलाकारांनी जगाला दिला निरोप

SHARES
01/9
Year End 2020 : २०२० मध्ये 'या' टीव्ही कलाकारांनी जगाला दिला निरोप
ससुराल सिमर का मालिकेतील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले आशिष रॉय यांचं २४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. ते ५५ वर्षांचे होते. मुंबईतील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्यावर डायलिसिस घेत असलेल्या आशिष रॉय यांनी मे महिन्यात सोशल मीडियावर आर्थिक मदतीसाठी विचारणा केली होती.
02/9
Year End 2020 : २०२० मध्ये 'या' टीव्ही कलाकारांनी जगाला दिला निरोप
टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता नरेंद्र झा यांचं वयाच्या ५५ व्या वर्षी १४ मार्च रोजी निधन झालं. झा यांनी अखेरचा श्वास रुंदी वडा इथल्या आपल्या फार्महाऊस घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचं निधन झालं. पत्नी पंकजा ठाकूर यांच्याबरोबर ते सुट्टीवर होते.
03/9
Year End 2020 : २०२० मध्ये 'या' टीव्ही कलाकारांनी जगाला दिला निरोप
समीर शर्मानं गळफास घेऊन आत्महत्या केली. समीर शर्मा, “ये रिश्ते है प्यार के” मध्ये अखेरच्या भूमिकेत दिसला होता. ऑगस्टमध्ये तो मुंबईतल्या त्याच्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळला होता. शर्मा क्यूँकी सास बी भी कभी बहु थी, इस प्यार को क्या नाम दू या शोमध्ये झळकले होते.
04/9
Year End 2020 : २०२० मध्ये 'या' टीव्ही कलाकारांनी जगाला दिला निरोप
७ डिसेंबर २०२० ची सकाळ झाली तीच दिव्या भटनागरच्या निधनाच्या बातमीनं. कोरोनामुळे ती त्रस्त होती. ये रिश्ता क्या कहलाता हैं या मालिकेत तिनं भूमिका केली होती. तिच्या नवऱ्यावर घरघुतू हिंसाचाराचा आरोप देखील करण्यात आला होता.
05/9
Year End 2020 : २०२० मध्ये 'या' टीव्ही कलाकारांनी जगाला दिला निरोप
सुपरस्टार सलमान खानच्या रेडीमध्ये अमर चौधरीची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या २६ वर्षीय अभिनेत्याचं कर्करोगानं निधन झालं. मोहित बघेल यांचं २३ मे रोजी उत्तर प्रदेशमधील मथुरा इथं निधन झालं.
06/9
Year End 2020 : २०२० मध्ये 'या' टीव्ही कलाकारांनी जगाला दिला निरोप
लीना आचार्य यांचं २१ नोव्हेंबरला दिल्लीत मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे निधन झालं. अभिनेत्री सुमारे दोन वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजारानं त्रस्त होती. तिच्या आईनं तिला एक मूत्रपिंड दान केलं होतं. परंतु अवयवदान देखील अभिनेत्रीसाठी काम करत नव्हतं.
07/9
Year End 2020 : २०२० मध्ये 'या' टीव्ही कलाकारांनी जगाला दिला निरोप
बिहारमधील टेलीव्हिजन अभिनेता अक्षत उत्कर्ष याचं २७ सप्टेंबर घरातच मृतावस्थेत आढळला होता. नैराश्यानं तो ग्रस्त असल्यानं आत्महत्या केल्याची चर्चा होती. पण त्याच्या कुटुंबियांनी नैराश्यात आत्महत्या केल्याचं मान्य केलं नाही. त्यांच्यानुसार त्याची हत्या झाल्याचा दावा कुटुंबियांनी केला होता.
08/9
Year End 2020 : २०२० मध्ये 'या' टीव्ही कलाकारांनी जगाला दिला निरोप
२५ वर्षीय अभिनेत्रीनं २५ मे रोजी आत्महत्या केली. क्राइम पेट्रोल, लाल इश्क आणि मेरी दुर्गा यासारख्या कार्यक्रमात काम करणारी अभिनेत्री मध्य प्रदेशमधील इंदोर इथं राहत्या घरी गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळली. प्रेक्षानं अक्षय कुमार-स्टारर पॅड मॅनमध्येही काम केलं आहे.
09/9
Year End 2020 : २०२० मध्ये 'या' टीव्ही कलाकारांनी जगाला दिला निरोप
अनुपमा पाठक २ ऑगस्ट रोजी मुंबई महानगर प्रदेशातील मीरा रोड भागात भाड्यानं घेतलेल्या फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडल्या. बिहारमधील ४० वर्षीय अभिनेत्री अनेक भोजपुरी चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये दिसली होती. अनुपमा पाठक यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये तिचा जीव घेण्यामागे आर्थिक समस्यांचा उल्लेख केला होता.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा