Advertisement

बेस्टच्या ताफ्यात लवकरच १०० डबल डेकर बस दाखल होणार

सध्या १२० बस ताफ्यात असून, डबल डेकर बसची स्वतंत्र ओळख आहे.

बेस्टच्या ताफ्यात लवकरच १०० डबल डेकर बस दाखल होणार
SHARES

मुंबईत धावणाऱ्या दुमजली बस मुंबईकरांसह पर्यटकांच्याही पसंतीस पडल्या आहेत. सध्या १२० बस ताफ्यात असून, डबल डेकर बसची स्वतंत्र ओळख आहे. अशातच आता बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात लवकरच १०० नविन डबल डेकर ताफ्यात दाखल होणार आहेत. सध्या ताफ्यातील असलेल्या १२० डबल डेकर बस टप्प्याटप्यात भंगारात काढल्या जाणार आहेत. त्या बदल्यात दाखल होणाऱ्या नवीन बससाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी बसमध्ये एकाऐवजी २ दरवाजे, सीसीटीव्ही कॅमेरे आदींचा समावेश असणार आहे. डबल डेकर बसची ओळख पुसली जाऊ नये आणि प्रवासी वाहून नेण्याची क्षमता कमी होऊ नये यासाठी भंगारात काढल्या जाणाऱ्या बसच्या बदल्यात १०० दुमजली बस घेण्याचा निर्णय झाला आणि त्याची निविदा मागविण्यात आली असून प्रत्यक्ष खरेदी होऊन बस ताफ्यात येण्यास काही महिने लागणार असल्याची माहिती मिळते आहे.

बसची वैशिष्ट्ये

  • भारत-६ श्रेणीतील बस आणि त्यात स्वयंचलित गिअर असतील.
  • बस थांब्याची माहिती देण्यासाठी बसमध्येच इलेक्ट्रॉनिक बोर्ड बसवण्यात येतील.
  • २ स्वयंचलित दरवाजे.
  • ते उघडबंद करण्याचे नियंत्रण बस चालकाकडे.
  • बसमधील २ वाहकांना परस्पर संपर्कासाठी विशेष व्यवस्था राहिल.
  • सीसीटीव्ही कॅमेरा असेल.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा