भूमिगत मेट्रो लाईन-3 (metro line-3)(कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मधील 11 स्थानकांचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने गुरुवारी मंजुरी दिली. ही एक्वा लाइन 33.5 किमी पसरली आहे. तसेच त्यात 27 मेट्रो स्थानकांचा (metro station) समावेश आहे.
पुढील आठवड्यात आरे आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (bkc) दरम्यान प्रवाशांची सेवेसाठी हा मार्ग अंशतः सुरू केला जाईल. ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) 3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान हिरवा झेंडा दाखवतील.
आरे आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यानची मुंबई (mumbai) मेट्रो लाईन-3 12.5 किमी लांबीची आहे. त्यात 10 स्थानकांचा समावेश आहे. तसेच मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून याची तपासणी सुरू असून अद्याप सुरक्षा प्रमाणपत्राची प्रतीक्षा आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) उर्वरित भागाचे काम करत आहे. तसेच याचे बांधकाम वेगवेगळ्या टप्प्यात आहे.
पूर्वी एका स्थानकाचे नाव वांद्रे असे होते, परंतु ते स्थानक वांद्रे (bandra) कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असल्याने त्याचे नाव बदलून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (bkc) असे करण्यात आले आहे. तसेच आता इतर स्थानकांचेही नाव बदलण्यात येणार आहेत.
बदललेल्या स्थानकांचे नाव पुढीलप्रमाणे -
1) सीएसएमटी (csmt) मेट्रो: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो
2) मुंबई सेंट्रल मेट्रो: जगन्नाथ शंकर शेठ मेट्रो
3) सायन्स म्युझियम : सायन्स सेंटर
4) शितलादेवी टेंपल : शितला देवी मंदिर
5) विद्यानगरी : वांद्रे कॉलनी
6) सांताक्रूझ: सांताक्रूझ मेट्रो
7) डोमेस्टीक एअरपोर्ट : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ - T1
8) सहार रोड : सहार रोड
9) इंटरनॅशनल एअरपोर्ट: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ - T2
10) एमआयडीसी: एमआयडीसी - अंधेरी
11) आरे: आरे जेव्हीएलआर
हेही वाचा