Advertisement

भाडेकपतीनंतर बेस्टच्या प्रवासी संख्येत १३ लाखांची भर

बेस्टच्या प्रवासी संख्येत अधिक वाढ झाली आहे. भाडेकपातीनंतर प्रवासी संख्येत १३ लाखांची भर पडली आहे.

भाडेकपतीनंतर बेस्टच्या प्रवासी संख्येत १३ लाखांची भर
SHARES

मागील अनेक वर्ष बेस्ट उफक्रम आर्थिक तोटा सहन करत आहे. त्यामुळं बेस्टची प्रवासी संख्याही कमी झाली आहे.मात्र, ही प्रवासी संख्या वाढवण्यासाठी बेस्टनं ताफ्यात बस गाड्यांची वाढीसह तिकीट दरकपातीचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार, प्रवाशांना किमान प्रवास ५ रुपये आणि एसी बसचा किमान प्रवास ६ रुपयांत करता येतो. बेस्ट प्रशासनाच्या या निर्णयानंतर बेस्टच्या प्रवासी संख्येत अधिक वाढ झाली आहे. तसंच, प्रवासी संख्येत १३ लाखांची भर पडली आहे. मात्र, महसूलवाढीचं आव्हान कायम असून त्यात या काळात प्रति दिन सरासरी ५४ लाखांची घट झाली आहे.

बेस्ट प्रशासनानं ९ जुलै २०१९ पासून भाडेकपात करत प्रवासी भाडे ५० टक्क्यांनी कमी केलं. तसंच, मुंबईकरांना दिलासा दिला. स्वस्तात मस्त प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. बेस्ट प्रवाशांच्या संख्येत मागील ७ महिन्यांत १३ लाख ७७ हजार प्रवाशांची (दररोजचे सरासरी) भर पडली आहे.

सध्या बेस्ट ५ किलोमीटरच्या साध्या प्रवासाकरिता ५ रुपये आणि वातानुकूलित प्रवासासाठी ६ रुपये भाडेआकारणी करते आहे. त्यामुळं बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ झाली. भाडेकपातीआधी दररोज सरासरी १९ लाख २३ हजार प्रवासी बेस्टनं प्रवास करत होते. हीच संख्या भाडेकपातीनंतर जानेवारी २०२० पर्यंत सरासरी २९ लाख ५ हजारापर्यंत गेली.

फेब्रुवारी महिन्यात पॉइंट टू पॉइंट सेवेमुळं त्यात आणखी भर पडली आहे. आता दररोज सरासरी ३३ लाख प्रवाशी बेस्टनं प्रवास करत आहेत. वांद्रे, सांताक्रूझ, देवनार, शिवाजीनगर, घाटकोपर, मुलुंड आगारांतर्गत सुटणाऱ्या बसगाड्यांना चांगला प्रतिसाद प्रवाशांकडून मिळत आहे.

प्रवासी वाढले असले तरी बेस्टच्या महसुलावर परिणाम झाला आहे. भाडेकपातीपूर्वी बेस्टला दररोज सरासरी २ कोटी ३६ लाख १६ हजार रुपये महसूल मिळत होता. हाच महसूल सरासरी १ कोटी ८२ लाख ११ हजार रुपयांवर आला आहे. बेस्टला दररोजच्या सरासरी ५४ लाख रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. भाडेकपात झाल्यानंतर बेस्टची तिजोरी सुट्ट्या पैशांनी भरू लागली आहे. बेस्टकडे १२ कोटी रुपयांपेक्षाही सुटी नाणी जमा झाली आहेत. एक रुपया, दोन रुपये आणि पाच रुपयांच्या नाण्यांचा यात समावेश आहे.

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वातानुकूलित व विनावातानुकूलित मिनी बसगाडय़ा दाखल केल्या. या विनावाहक सेवा ‘पॉइंट टू पॉइंट’ दिल्या जात आहेत. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो. यामुळेही बेस्टच्या प्रवासी संख्येत काही प्रमाणात भर पडल्याचा दावा बेस्टने केला. ही सेवा नोव्हेंबर २०१९ पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली. त्यानंतर याचा विस्तार केला गेला.

विनावाहक सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्या दीड महिन्यातच ३५ हजारपेक्षा जास्त प्रवाशांची भर पडली. त्यात आणखी वाढ होऊन ती लाखभराच्या जवळपास पोहोचली आहे. याला बेस्ट कर्मचारी संघटनांचा विरोध आहे. बेस्टने सुरू केलेली विनावाहक सेवा सध्या ८६ मार्गावर सुरू आहे. यामध्ये ४१ मार्गावर बेस्टच्या स्वमालकीच्या २२४ बस विनावाहक धावत आहेत, तर ४५ मार्गावर भाडेतत्त्वावरील ३२५ बस धावत आहेत.



हेही वाचा -


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा