Advertisement

Coronavirus Updates: परदेशातून आलेल्या पश्चिम रेल्वेच्या २ चालकांचं विलगीकरण

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेनं परदेशी प्रवास केलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे.

Coronavirus Updates: परदेशातून आलेल्या पश्चिम रेल्वेच्या २ चालकांचं विलगीकरण
SHARES

पश्चिम रेल्वेच्या २ चालकांचं विलगीकरण करण्यात आलं आहे. सौदी अरेबिया आणि मलेशियाहून प्रवास करून आलेल्या २ चालकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. पश्चिम रेल्वेचे हे २ चालक परदेशातून प्रवास करून आल्याने त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, ते करोनाचे संशयित रुग्ण असल्याचे समोर आलं आहे.

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेनं परदेशी प्रवास केलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम रेल्वेत चालक म्हणून कार्यरत असलेले एक चालक सौदी अरेबियाला तर दुसरं मलेशियाला गेले होते. परदेशी प्रवास केल्यानं करोनाचे संशयित रुग्ण असल्याचे तपासणीस समोर आलं. त्यापैकी एक चालक रेल्वेला याची कोणतीही पूर्वकल्पना न देता २ दिवस गाडी चालवत होता.

संशयित चालक बोरीवलीवरून चर्चगेटला जाणारी गाडी चालवताना त्याला मुंबई सेंट्रल स्थानकात गाठून रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी तो करोनाचा संशयित रुग्ण असल्याचं निदर्शनास आलं. तसेच सौदी अरेबियावरून आलेल्या चालक मंगळवापासून कामावर रुजू होणार होता. त्यांची वैद्यकीय चाचणी केल्यावर करोनाबाधित नसल्याचं निष्पन्न झालं.

कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका, राज्य सरकार, पोलीस मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. विविध उपाययोजनांची मदत घेत परिस्थिती हाताळत आहेत. दरम्यान, पश्चिम व मध्य रेल्वेनं देखील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गुरूवारी एसी लोकल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.



हेही वाचा -

Coronavirus Updates: शासकीय कार्यालयांसह शाळा-कॉलेजांमध्येही ५० टक्के उपस्थिती

Coronavirus Updates: लोकलमधील भजनी मंडळींचा भजनं बंद करण्याचा निर्णय



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा