Advertisement

Coronavirus Updates: लोकलमधील भजनी मंडळींचा भजनं बंद करण्याचा निर्णय

भजनी मंडळींनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लोकलमध्ये अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी भजन-आरती न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Coronavirus Updates: लोकलमधील भजनी मंडळींचा भजनं बंद करण्याचा निर्णय
SHARES

मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलमध्ये अनेकदा प्रवासी भजनं म्हणत प्रवास करत असतात. देवाची गाणी गात व टाळ वाजवत हे प्रवासी भजनं म्हणत असतात. मात्र, आता या भजनी मंडळींनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लोकलमध्ये अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी भजन-आरती न करण्याचा निर्णय घेतला आहे. चर्चगेट-विरार दरम्यान अनेक लोकलमध्ये प्रवाशांकडून उत्स्फूर्तपणे भजन गात प्रवास केला जातो.

रेल्वे तिकीट खिडकीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोफत सॅनिटायझर व मास्कचं वाटप करत त्यांच्या कामाला सलाम केला असल्याचं क्षेत्रीय रेल्वे प्रवासी समितीच्या सदस्य वंदना सोनावणे यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेवरील १६३ भजनी मंडळांना प्रत्येकी ५० या प्रकारे मास्क देण्यात आले आहेत.

या मास्कचं वाटप चर्चगेट-विरार लोकलमधील सहप्रवाशांना करण्यात आलं. मध्य रेल्वेवर सुमारे २०० भजनी मंडळं आहेत. त्यांना देखील प्रवाशांना मोफत मास्क वाटण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भजनी मंडळींनी गर्दी टाळण्यासाठी लोकलमधील भजन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी लोकलमध्ये प्रवेश करताना मास्क वापरावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावं, असा संदेशंही देण्यात येत आहे.



हेही वाचा -

Coronavirus Updates: सुरक्षेसाठी व्यापाऱ्यांचा दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय

Coronavirus : 'त्या' कोरोनाबाधितानं लावली चक्क लग्नाला हजेरी, सगळेच संशयाच्या फेऱ्यात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा