एसी लोकलचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी, पश्चिम रेल्वेनं एसी लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. संख्या वाढवण्याबरोबरच सिंगल-जर्नी तिकिटांसाठी भाडे रचना देखील बदलण्यात येणार आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, २५ डिसेंबर २०१७ रोजी पहिल्यांदा वातानुकूलित लोकल गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. जवळपास चार वर्षांनंतर, पश्चिम रेल्वे आता आणखी ८ एसी सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे. असं झालं तर दररोज एकूण २० एसी लोकल सुरू होतील.
कोविड-१९ साथीच्या आजारापूर्वी, सुमारे २० हजार प्रवाशांनी १२ एसी सेवांचा लाभ घेतला. चर्चगेट-विरार कॉरिडॉरवर आता ८ नवीन सेवा प्रस्तावित आहेत. काही सेवा गोरेगाव, बोरीवली आणि नालासोपारा इथीन सुरू होणार आहेत.
एसी लोकलला प्रवाशांचा अधिक चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी पश्चिम रेल्वे आगामी काळात भाडे आणखी कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते. एसी लोकलचे भाडे मेट्रोच्या भाड्याप्रमाणे असू शकते, असं सांगितलं जात आहे.
हेही वाचा