Advertisement

बेस्टची 'इतक्या' फुकट्या प्रवाशांवर कारवाई

शिथिल झालेले निर्बंध, वाढलेली प्रवाशी संख्या आणि धावत असलेल्या विनावाहक बेस्टच्या बसेसमधून अनेक प्रवासी फुकट प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे.

बेस्टची 'इतक्या' फुकट्या प्रवाशांवर कारवाई
SHARES

शिथिल झालेले निर्बंध, वाढलेली प्रवाशी संख्या आणि धावत असलेल्या विनावाहक बेस्टच्या बसेसमधून अनेक प्रवासी फुकट प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. बेस्ट बसमधूनही विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. २०२१ मध्ये २३ हजार ९७२ विनातिकीट प्रवासी आढळले असून २०२०च्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे.

गर्दीच्या बसमध्ये चढलेले अनेक प्रवासी दरवाज्याजवळ उभे राहून तिकीट काढल्याशिवायच आपल्या थांब्यावर उतरण्याचा प्रयत्न करतात. काही प्रवासी गर्दीच्या वेळी वाहकाकडून मुद्दाम तिकीट घेत नाहीत आणि आपल्या थांब्यावर उतरून जातात. या सर्वच प्रवाशांना पकडून दंड वसूल करण्याचा प्रयत्न तिकीट तपासनीसांच्या माध्यमातून ‘बेस्ट’ करत असते.

बेस्ट प्रशासनानं तर सुरू केलेल्या विनावाहक सेवेचाही काही जण गैरफायदा घेतात. यात बसमध्ये वाहक नसून बस थांब्यावरच उभ्या असलेल्या वाहकाकडून प्रवाशांना तिकीट दिले जाते. मधल्या थांब्यावर गर्दीच्या वेळी काही प्रवासी वाहकाची नजर चुकवून बसमध्ये प्रवेश करतात व सर्रास विनातिकीट प्रवास करतात. तर काही वेळा बस थांब्यावरच तिकीट देण्यासाठी वाहक उपलब्ध नसल्याने शेवटचा थांबा येईपर्यंत प्रवाशाला तिकीट उपलब्ध होत नाही. त्यामुळे विनातिकीट प्रवासी संख्येत आणखी भर पडते.

मिळालेल्या माहितीनुसार, तिकीट तपासनीसांनी केलेल्या कारवाईत २०२० मध्ये ११ हजार ४६९ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. २०२१ मध्ये या संख्येत वाढ झाली आहे.

गेल्या वर्षांत २३ हजार ९७२ विनातिकीट प्रवासी आढळल्याची माहिती उपक्रमाने दिली. यातून लाखो रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे. गेल्या वर्षांत १४ लाख ३९ हजार ५८० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्याआधीच्या वर्षी ६ लाख ५३ हजार रुपये दंड जमा झाला होता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा