Advertisement

रविवारी सहा ट्रेन रद्द; इगतपुरी स्थानकावर स्पेशल ट्रॅफिक ब्लाॅक

मध्य रेल्वेनं सिग्नल यंत्रणेत बदल करण्यासाठी इगतपुरी स्थानकावर स्पेशल ट्रॅफिक ब्लाॅक घेतला आहे. त्यामुळे सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर इतर गाड्या उशीरानं धावणार आहेत.

रविवारी सहा ट्रेन रद्द; इगतपुरी स्थानकावर स्पेशल ट्रॅफिक ब्लाॅक
SHARES

रविवारी मुंबई ते नाशिक असा प्रवास रेल्वेनं करण्याचा विचार जर कुणी करत असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ती अशी की रविवारी इगतपुरी रेल्वे स्थानकावर रेल्वेकडून स्पेशल ट्रॅफिक ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबईवरून नाशिकला जाणाऱ्या आणि नाशिक मार्गे मुंबईला येणाऱ्या सहा गाड्या रद्द केल्या आहेत. तर अनेक गाड्यांच्या वेळात बदलही करण्यात आले आहेत. 


गाड्या उशीरानं धावणार 

दिवाळीच्या तोंडावर रेल्वे वाहतुक सेवा विस्कळीत होणार असल्यानं त्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. मध्य रेल्वेनं सिग्नल यंत्रणेत बदल करण्यासाठी स्पेशल ट्रॅफिक ब्लाॅक घेतला आहे.  दुपारी ३.४५ मिनिटे ते रात्री १.४५ दरम्यान हा स्पेशल ब्लाॅक असणार आहे. त्यामुळे सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर इतर गाड्या उशीरानं धावणार आहेत. 


रद्द गाड्या 

  • एलटीटी-मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस 
  • मुंबई-भुसावळ पॅसेंजर (रविवार आणि सोमवारी) 
  • भुसावळ-मुंबई पॅसेंजर (शनिवार आणि रविवारी) 
  • भुसावळ-सीएसएमटी-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस (रविवारी) 
  • भुसावळ-पुणे-भुसावळ एक्स्प्रेस (रविवारी) 
  • इगतपुरी-मनमाड-इगतपुरी पॅसेंजर (रविवारी) 


बदल झालेल्या गाड्या

  • एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस ही आटगाव येथे दु. २.३२ ते सायं. ४.४५ पर्यंत थांबवण्यात येईल. 
  • एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस स. ११.१० ऐवजी दु. १.२० वाजता सोडण्यात येईल. वाशिंद येथे दु. २.४० ते सायं. ४.५० पर्यंत थांबवली जाईल. 
  • सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेस स. ११.०५ ऐवजी दु. १.३० वा. सुटेल. ही गाडी खडिवली येथे दु. २.५० ते. सायं. ५.२० पर्यंत थांबेल. 
  • एलटीटी-पाटलीपुत्र एक्स्प्रेस रविवारी रा. ११.२५ ऐवजी सोमवारी दु. ४.३० वा. सुटेल. 
  • सीएसएमटी-गोरखपूर विशेष एक्स्प्रेस सोमवारी रा. १२.२० वा. सुटेल. 
  • पाटलीपुत्र-एलटीटी, छापरा-एलटीटी, गोरखपूर-एलटीटी, गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस व्हाया अलाहाबाद या गाड्या शनिवारी मुंबईत उशिराने दाखल होतील. 
  • एलटीटी-दरभंगा एक्स्प्रेस रविवारी कसारा येथे दु. २.१३ ते सायं. ५ पर्यंत थांबेल. 
  • एलटीटी-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस एलटीटी येथून रविवारी दु. १२.४० वा. सुटून खडीवली येथे दु. २.२० ते सायं. ४.५० पर्यंत थांबेल. 
  • एर्नाकुलम-निझामुद्दीन मंगला एक्स्प्रेस आसनगाव येथे रविवारी दु. २.५० ते सायं. ४.५० पर्यंत थांबेल. 


रद्द केलेले थांबे 

नागपूर-सीएसएमटी सेवाग्राम एक्स्प्रेसला शनिवारी नाशिक येथे अंतिम थांबा देण्यात येईल. 



हेही वाचा - 

दिवाळीमुळे मध्य, पश्चिम मार्गावर मेगाब्लाॅक रद्द




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा