Advertisement

दिवाळीमुळे मध्य, पश्चिम मार्गावर मेगाब्लाॅक रद्द

मध्य अाणि पश्चिम रेल्वेने रविवारी ४ नोव्हेंबरचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. रविवारएेवजी दोन्ही मार्गांवर शनिवारी रात्री मेगाब्लाॅक घेण्यात येणार अाहे.

दिवाळीमुळे मध्य, पश्चिम मार्गावर मेगाब्लाॅक रद्द
SHARES

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर अाल्याने रविवारी खरेदीचा बेत अाखलेल्यांना रेल्वेने दिलासा दिला अाहे. मध्य अाणि पश्चिम रेल्वेने रविवारी ४ नोव्हेंबरचा मेगाब्लॉक रद्द केला आहे.  रविवारएेवजी दोन्ही मार्गांवर शनिवारी रात्री मेगाब्लाॅक घेण्यात येणार अाहे. हार्बर मार्गावर मात्र रविवारी सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लाॅक घेण्यात येणार अाहे.


मध्यरात्री ब्लाॅक

मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री २ ते ३ वाजेदरम्यान कल्याण ते टिटवाळा ब्लाॅक घेण्यात येईल. या ब्लाॅकमुळे मुझफ्फरपूर-एलटीटी पवन एक्स्प्रेस,  अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, गोरखपूर-एलटीटी, शालिमार-एलटीटी, हावडा-सीएसएमटी मेल, नागपूर-सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस या गाड्या २० ते ४० मिनिटे उशिरा पोचणार अाहे. 

 

वसई - वैतरणा ब्लाॅक

पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री ११.५० ते पहाटे २.५० पर्यंत वसई ते वैतरणा स्थानकामध्ये अप आणि रात्री १.२५ ते ४.२५ पर्यंत डाऊन मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे  मेल, एक्स्प्रेस गाड्या १५ मिनिटे उशिराने धावतील. 


पनवेल - कुर्ला विशेष लोकल

हार्बर रेल्वेवर रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी अाणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  ते वांद्रे मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. या मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेपर्यंत सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० आणि चुनाभट्टी-सीएसएमटी मार्गावर सकाळी ११.१० ते सायं. ४.४० पर्यंत सेवा खंडित राहणार अाहे. या कालावधीत पनवेल ते कुर्लासाठी विशेष लोकल चालवल्या जातील. 



हेही वाचा- 

ओला, उबर चालक मालकांचा संप अखेर मागे




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा