Advertisement

अहवालानुसार 60% मुंबईकर मेट्रो 3 वापरण्यास उत्सुक

सर्वेक्षणानुसार, 40 टक्के लोकांना मेट्रो 3 च्या सुरक्षिततेबद्दल खात्री नाही.

अहवालानुसार 60% मुंबईकर मेट्रो 3 वापरण्यास उत्सुक
SHARES

आरे ते बीकेसी या कुलाबा (colaba) -वांद्रे (bandra) -सीप्झ (seepz) मेट्रो 3 मार्गाचा पहिला टप्पा लवकरच सेवेत दाखल होणार आहे. मुंबईकर (mumbai) भुयारी मार्गाच्या प्रवासाची वाट पाहत आहेत. जवळपास 60 टक्के मुंबईकर मेट्रो 3 मार्ग वापरण्यास उत्सुक आहेत. त्यापैकी 60 टक्के लोक सध्या रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करत आहेत.

अर्थ ग्लोबल या परिवहन सेवा सल्लागाराने मेट्रो 3 (mumbai metro) च्या वापराबाबत सर्वेक्षण केले. त्यातुन मुंबईकरांचा कल समोर आला आहे. हायस्पीड वाहतूक व्यवस्थेला भूमिगत मेट्रो हा पर्याय असल्याने प्रवासाचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे या नवीन वाहतुकीचा वापर करण्यास नागरिक अधिक उत्सुक आहेत.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) 33.5 किमीच्या मेट्रो 3 (metro 3) मार्गावर काम करत आहे. या मार्गाला उशीर झाला असला तरी आता त्यातील आरे ते बीकेसी विभाग लवकरच सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी कदाचित आरे ते कफ परेड या संपूर्ण मार्गावर प्रवास करता येईल.

दरम्यान, जुलै महिन्यात हा मार्ग वाहतूक सेवेत दाखल झाले. या पार्श्वभूमीवर मेट्रो 3 बाबत मुंबईस्थित अर्थ ग्लोबल संस्थेतर्फे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मेट्रो 3 च्या वापराबाबत अंधेरी पूर्व, विलेपार्ले, कलिना, वांद्रे पूर्व आणि धारावी भागातील 1482 नागरिकांनी आपले मत मांडले आहे.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 60 टक्के नागरिकांनी मेट्रो 3 चा वापर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 58.9 टक्के पुरुष आणि 57.7 टक्के महिलांनी प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी मेट्रो 3 वापरणार असल्याचे सांगितले.

मुंबईत मेट्रोचे जाळे तयार झाल्यानंतर मेट्रो 3 मार्ग इतर मेट्रो मार्गांशी जोडला जाईल, परंतु या अहवालातून मेट्रो 3 च्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे.

रिक्षा, टॅक्सीपेक्षा मेट्रो बरी

सध्या रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करणारे 63 टक्के नागरिक मेट्रो 3 साठी उत्सुक आहेत. सध्या लोकल आणि बेस्ट बसने प्रवास करणारे 59 टक्के आणि चारचाकी आणि दुचाकीने प्रवास करणारे 57 टक्के नागरिक मेट्रो 3 साठी उत्सुक आहेत. मेट्रो प्रवासासाठी उत्सुक असलेल्यांपैकी 58 टक्के पुरुष आणि 57 टक्के महिला आहेत.

संभाव्य वापरकर्त्यांच्या वयोगटाचा विचार करता, 18 ते 30 वयोगटातील 58 टक्के, 31 ते 45 वयोगटातील 56 टक्के, 46 ते 60 वयोगटातील 59 टक्के आणि 60 वर्षांवरील वयोगटातील 49 टक्के लोकांनी स्पष्ट केले आहे, की ते या मार्गाचा वापर करतील.

40 टक्के नागरिक मेट्रो 3 च्या बाजूने का नाहीत?

या 40 टक्के लोकांना त्याच्या सुरक्षिततेबद्दल खात्री नाही. केवळ 14.6 टक्के महिला आणि 12.9 टक्के पुरुषांना वाटते की ही वाहतूक सुरक्षित आहे. तसेच मेट्रो 3 मुंबईच्या अनेक भागांना जोडलेली नाही. त्याचप्रमाणे मेट्रो 3 चे भाडे जास्त असेल असे काहींचे मत आहे.



हेही वाचा

मालाड : महापालिकेकडून 500 खारफुटींची कत्तल, रहिवाशांचा आरोप

एसटीचा विस्तार होणार!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा