Advertisement

मुंबईत दादरसह 'या' रेल्वे स्थानकांचा होणार मेकओव्हर

भारतीय रेल्वेने स्टेशनला नवा लूक देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत दादरसह 'या' रेल्वे स्थानकांचा होणार मेकओव्हर
SHARES

महाराष्ट्र राज्यातील 19 रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार आहे. यामध्ये मुंबईतील स्थानकांचा समावेश आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील दादरसह 7 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. (Mumbai Railway Stations Set For Makeover) तर राज्यातील पुणे, नाशिक, नांदेड, अमरावती, भुसावळ या प्रमुख रेल्वे स्थानकांचाही कायापालट होणार आहे.

भारतीय रेल्वेने स्टेशनला नवा लूक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन चकाचक आणि बेस्ट दिसणार आहेत. मुंबई सेंट्रल, ठाणे, नागपूर, अजनी, जालना आणि औरंगाबाद रेल्वेस्थानके यापूर्वीच मेजर अपग्रेडेशन ऑफ स्टेशन्स पुनर्विकासासाठी हाती घेतली गेली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाला आर्थिक व्यवहारासंबंधीच्या कॅबिनेट कमिटीने यापूर्वीच मंजुरी दिलेली आहे.

मुंबईतील अंधेरी, बांद्रा टर्मिनस, बोरिवली, दादर, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस यांचा समावेश आहे. तर पुणे, लोणावळा, मिरज, भुसावळ, नांदेड, नाशिक रोड, साईनगर शिर्डी, शिवाजीनगर पुणे, ठाकुर्ली, अमरावती, अकोला, वर्धा रेल्वेस्थानकांचा पुनर्विकासासाठी अभ्यास करण्यात येणार आहे.

राज्यातील 108 रेल्वेस्थानकांचा यापूर्वीच आदर्श स्थानकांच्या योजनेत विकास करण्यात आलेला आहे. देशभरात आदर्श रेल्वे स्थानक योजनेत 1552 स्थानकांची निवड करण्यात आली. त्यापैकी 1218 स्थानकांचा विकास करण्यात आला आहे. उर्वरित स्थानकांचा जून 2023 पर्यंत विकास करण्यात येणार आहे.



हेही वाचा

मध्य रेल्वे CSMT, दादर, ठाणे, कल्याणसह इतर ३ स्थानकांवर उभारणार स्तनपान पॉड्स

कोरोनाचा पुन्हा हाहाकार! केंद्र सरकारही अलर्ट, राज्यांना निर्देश

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा