Advertisement

धावत्या लोकलमधून पडून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

धावत्या लोकलमधून पडून एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

धावत्या लोकलमधून पडून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
SHARES

धावत्या लोकलमधून पडून एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या मृत मुलाचे नाव अस्पष्ट असून, तो चर्चगेटच्या दिशेनं प्रवास करत होता. त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती बोरीवली रेल्वे पोलिसांनी दिली.

संबंधीत तरुण बुधवारी सकाळच्या सुमारास चर्चगेटच्या दिशेनं लोकल प्रवास करत होता. त्यावेळी गोरेगाव ते मालाड स्थानकादरम्यान हा अपघात झाला. याप्रकरणी बोरीवली रेल्वे पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आल्याचं समजतं.

लोकलमध्ये सकाळच्या सुमारास चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. बुधवारी सकाळीच लोकलला खूप गर्दी होती. त्यात हा २२ वर्षाय तरुण दरवाजाजवळ उभा होता. गोरेगाव ते मालाड स्थानकादरम्यान लोकलमध्ये चढणाऱ्या व उतरणाऱ्या प्रवाशांचा धक्का लागल्याने तो धावत्या लोकलमधून खाली पडला.

लोकलमधून तरुण खाली पडल्याने एकच गोंधळ उडाला होता. प्रवाशांनी लगेच आरडा-ओरडा करत लोकल थांबवून तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मृत्यू झाला. बोरीवली रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती बोरीवली रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा