Advertisement

एसी लोकल नाताळपासून धावणार, सर्व तांत्रिक अडथळे दूर

पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या पहिल्या एसी लोकलचे सर्व तांत्रिक अडथळे दूर झाले आहेत. रेल्वे बोर्डाबरोबरच मुख्य सुरक्षा आयुक्तांनीही त्यास परवानगी दिली आहे. येत्या ५-६ दिवसांत पश्चिम रेल्वेतर्फे ही लोकल सेवेत आणली जाणार आहे.

एसी लोकल नाताळपासून धावणार, सर्व तांत्रिक अडथळे दूर
SHARES

मुंबईकरांना नाताळपासून गारेगार लोकलची मजा लुटता येणार आहे. कारण पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या पहिल्या एसी लोकलचे सर्व तांत्रिक अडथळे दूर झाले आहेत. रेल्वे बोर्डाबरोबरच मुख्य सुरक्षा आयुक्तांनीही त्यास परवानगी दिली आहे. येत्या ५-६ दिवसांत पश्चिम रेल्वेतर्फे ही लोकल सेवेत आणली जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.


आठवड्यातून ५ दिवस सेवा

एसी लोकल आठवड्यातून ५ दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंतच चालवण्यात येईल. देखभाल-दुरुस्तीसाठी दोन दिवसांचा अवधी मिळावा हा विचार यामागे असल्याचं सांगण्यात आलं आहे.


चर्चगेट ते विरार वातानुकूलित लोकल

मध्य रेल्वेवर दीड वर्षांपूर्वी वातानुकूलित लोकल गाडी दाखल झाली होती. पण, मध्य रेल्वेवर तांत्रिक मुद्दा उपस्थित झाल्यानं काही महिन्यांपूर्वी पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकल दाखल झाली आणि लोकलच्या यशस्वीरीत्या चाचण्या घेण्यात आल्यानंतर लोकल चालवण्याचा मार्ग मोकळा झाला. ही लोकल चर्चगेट ते डहाणूपर्यंत चालवण्याची परवानगी जरी असली तरी सध्या चर्चगेट ते विरापर्यंत चालवण्यात येईल. वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरावर लवकरच अंतिम निर्णय होणार असून लोकल २५ डिसेंबरपासून सेवेत आणण्याचा प्रयत्न आहे.

- मुकुल जैन, पश्चिम रेल्वे-विभागीय रेल्वे व्यवस्थापक

पश्चिम रेल्वेने काही दिवसांपूर्वी ही सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे पत्र पाठवले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद देताना बोर्डाने सेवा चालवण्यासाठी परवानगी दिली आहे. दिवसाला १२ फेऱ्या चालवण्यास परवानगी असली तरीही सुरुवातीला ८ ते १० इतक्या फेऱ्या चालवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रेल्वे बोर्डाने प्रवासी सुरक्षेसाठी प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही फायर फायटिंगची उपकरणे बसवण्याचीही सूचना केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा