Advertisement

'मरे'ची सिग्नल यंत्रणा आता प्रगत होणार


'मरे'ची सिग्नल यंत्रणा आता प्रगत होणार
SHARES

सिग्नल यंत्रणेत वारंवार होणाऱ्या बिघाडावर मात करण्यासाठी मध्य रेल्वेने यंत्रणेत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याचकरता 'रुट रिले इंटरलॉकिंग'(आरआरआय) इमारतीचे सीएसटी स्थानकात सोमवारी मध्ये रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्याहस्ते भूमीपूजन करण्यात आले. विशेष म्हणजे आता यामुळे मध्य रेल्वेवरील सिग्नल यंत्रणा आणखी अद्यायावत होणार असल्याची माहिती जनसंपर्क विभागातून देण्यात आली.

'रुट रिले इंटरलॉकिंग' प्रणालीमुळे रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होते. अनेक मार्गिका, सिग्नलचे अनेक पॉईंट्स यांना एकाच ठिकाणाहून नियंत्रित करणाऱ्या प्रणालीमुळे गाड्यांची वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होते. पावसाळ्यात होणाऱ्या सिग्नल बिघाडांचे प्रमाण देखील यामुळे कमी होते. यापूर्वी कुर्ला स्थानकात अशा प्रकारची यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, सीएसएमटी येथील आरआरआय इमारत आणि यार्ड रिमॉडेलिंगसाठी 60.47 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यार्ड रिमॉडलिंगमध्ये सीएसएमटी स्थानकातील 10,11,12 आणि 13 या फलाटांची लांबी देखील वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसटी स्थानकातून रवाना करण्यात येणाऱ्या 24 डब्यांच्या लांब पल्याच्या गाड्या या फलाटांवर उभ्या करणे शक्य होणार आहे. तसेच वॉशेबल अॅप्रॉनची देखील निर्मिती करण्यात येत असून, त्यामुळे स्थानक स्वच्छ ठेवण्यास देखील मदत होणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा