Advertisement

आता तुम्हालाही करता येणार AC Local मधून प्रवास, वाचा सविस्तर

रेल्वे एसी लोकल ट्रेन सेवांची संख्या वाढवण्याचा विचार रेल्वे करत आहे.

आता तुम्हालाही करता येणार AC Local मधून प्रवास, वाचा सविस्तर
(File Image)
SHARES

मुंबईकरांना गारेगार प्रवास करण्यास मिळावा यासाठी मध्य (Central Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर एसी लोकल (AC Local) सुरू करण्यात आल्यात. एसी लोकलमध्ये फर्स्ट क्लास पासधारकांना (First Class Pass Holder) लोकलच्या पासने प्रवास करायला मिळावी अशी मागणी होत होती.

फर्स्टक्लास पासधारकांना एसी लोकलने प्रवास करण्याची इच्छा असूनही लांबलचक रांगांमुळे एसी लोकलचं तिकीट खरेदी करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. तिकीटांच्या या रांगा कमी करता आल्या किंवा आहे त्या पासमध्ये जास्त पैसे भरून एसी लोकलचा प्रवास करण्यास तयार आहोत अशी विनंती फर्स्ट क्लास पास धारकांची आहे.

रेल्वे प्रवाशांची ही मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. फर्स्ट क्लास पासधारकांना एसी लोकलचे स्वतंत्र तिकीट काढण्याऐवजी त्यांच्याकडे असलेल्या पासने प्रवास करण्याची परवानगी मिळणार आहे.

मुंबईकरांना आता एसी लोकलसाठी आपला फर्स्टक्लास पास अपग्रेड (First Class Pass Upgrade) करता येणार आहे. प्रवासी एसी लोकलचा डिफरन्स भरून आपला पास अपग्रेड करू शकणार आहेत अशी शक्यता आहे. सर्व बुकींग काऊंटर आणि यूटीएसवर (UTS) ही यंत्रणा लवकरच कार्यान्वित केली जाईल.हेही वाचा

1 सप्टेंबरपासून गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा, मांडवा बोटसेवा सुरू

गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी WR, CR अतिरिक्त लोकल चालवणार, पहा वेळापत्रक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा