Advertisement

रिक्षा-टॅक्सींच्या मीटर फेरबदलाला थंड प्रतिसाद

मुंबईसह आसपासच्या परिसरातील मुंबईकरांना प्रवासी सुविधा देणाऱ्या रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाली आहे.

रिक्षा-टॅक्सींच्या मीटर फेरबदलाला थंड प्रतिसाद
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरातील मुंबईकरांना प्रवासी सुविधा देणाऱ्या रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाली आहे. प्रत्येकी ३ रुपयानं ही भाडेवाढ झाली आहे. शिवाय, रिक्षा-टॅक्सी चालकांना मीटरचे रिकॅलिब्रेशन (फेरबदल) करण्यास ३ महिन्यांची मुदत आहे. परंतु १ मार्चपासून रिकॅलिब्रेशनला सुरुवात होऊनही त्याला थंड प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई महानगरातील एकाही आरटीओमध्ये ही वाहनं नोंदणीसाठी आली नसल्याची माहिती समोर आली. महानगरात ४ लाखांहून अधिक रिक्षा, तर ६० हजार टॅक्सी आहेत. रिक्षा व टॅक्सीचं किमान भाडं १ मार्चपासून प्रत्येकी ३ रुपयांनी वाढलं. परंतु, कोरोनाकाळात प्रवासी कमी मिळत असतानाही भाडेवाढीमुळं प्रवासी आणखी कमी होण्याची भीती चालकांना आहे. काही रिक्षा, टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणीही केली होती, तर काहींना ती नको होती. मात्र, ५ वर्षांत भाडेवाढच न दिल्यानं खटुआ समितीच्या शिफारशींनुसार अखेर भाडेवाढ देण्यात आली.

एक मार्चपासून वाढ देतानाच मे महिन्यापर्यंत मीटरमध्ये फेरबदल करण्याची मुदत दिली आहे. त्यासाठी वाहन नोंदणीतील शेवटच्या क्रमांकानुसार मीटर कॅलिब्रेशनची कामे हाती घेण्यात येत असून १० मे २०२१ पर्यंत मीटरमध्ये बदल अपेक्षित आहे. त्यासाठी मीटरमध्ये एक चीप बसवतानाच त्याची सव्‍‌र्हिसिंग आणि आरटीओ पासिंग असा ७०० रुपये शुल्क चालकांना आकारले जाणार आहे. मुंबई महानगरातील जवळपास ८ उत्पादकांकडे मीटरमध्ये बदल करण्याचं काम सोपवण्यात आले आहे.

मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी, बोरिवलीसह, ठाणे आरटीओत कॅलिब्रेशन झालेली एकही रिक्षा, टॅक्सी पासिंगसाठी आलेली नाही. मुळातच मुंबई महानगरात ४ लाख ६० हजार रिक्षा आणि ६० हजार टॅक्सी असून त्यांच्या मीटरचे रिकॅलिब्रेशन वेळेत करणं आव्हानात्मक आहे. मीटरमध्ये बदल होत नाही, तोपर्यंत चालकांना हाती आलेल्या नवीन दरपत्रकानुसारच भाडं आकारावं लागणार आहे. कॅ लिब्रेशन वेळेत पूर्ण झाले नाही, तर काय असा प्रश्नही आहे. परंतु नवीन दरपत्रकही चालकांच्या हाती आलेले नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा