Advertisement

रिक्षा प्रवासही महागला, कल्याण डोंबिवलीत ‘इतकी’ दरवाढ

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परिवहन विभागानं नवीन दरपत्रक जाहीर केलं आहे.

रिक्षा प्रवासही महागला, कल्याण डोंबिवलीत ‘इतकी’ दरवाढ
SHARES

कल्याण-डोंबिवलीमध्ये रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परिवहन विभागानं नवीन दरपत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यासाठी ९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

परिवहन विभागाने यावर प्रवाशांकडून हरकती मागवल्या होत्या. मात्र, तीन ते चार जण वगळता इतरांनी त्याकडे पाठ फिरवली.

कल्याण-डोंबिवलीत केलेली रिक्षा भाडेवाढ ही सुट्ट्या पैशांच्या वादामुळे करण्यात आली आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यासाठी ८ रुपये शेअर भाडे आकारले जायचे. मात्र, रिक्षाचालक सुट्टे पैसे नसल्याचे सांगत प्रवाशांकडून १० रुपये घ्यायचे. आता या भाड्यात १ रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे सुट्ट्या पैशांचा वाद राहणारच आहे. यापूर्वी प्रमाणेच आताही रिक्षाचालक सरसकट दहा रुपयेच घेतील.

कल्याण-डोंबिवलीतील काही थांब्याववरून रिक्षाचालक हे चक्क चार ते पाच प्रवाशांची वाहतूक करतात. त्यांच्याकडून खरे तर शेअर भाडे आकारणे अपेक्षित आहे. मात्र, दुप्पट भाडे वसूल केले जाते. त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप आहे.

यावर तोडगा म्हणून आता आरटीओनं नवीन दरपत्रक जाहीर केले. त्यावर सूचना आणि हरकती मागवल्या. मात्र, फक्त तीन-चार प्रवासी वगळता इतरांनी त्याकडे पाठ फिरवली.

रिक्षा वाहतूक पुन्हा सुरू झाल्यानंतर रिक्षाचालकांवर कारवाई केली नाही. मात्र, आता अतिरिक्त भाडे वसूल केले किंवा बेशिस्त वागणूक केली, तर रिक्षाचालकांवर कारवाई करू, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आला आहे.हेही वाचा

परदेशातून येणाऱ्यांसाठी मुंबई विमानतळावर वेगळा कॉरिडॉर

येत्या २ वर्षांत १० मोनो धावणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा