Advertisement

आॅफिस कर्मचाऱ्यांसाठी बेस्टची ८ जूनपासून सेवा सुरू

सध्याच्या घडीला लोकल ट्रेनची सेवा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत बेस्ट प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना सोमवारपासून सेवा देण्याचं ठरवलं आहे.

आॅफिस कर्मचाऱ्यांसाठी बेस्टची ८ जूनपासून सेवा सुरू
SHARES

महाराष्ट्र सरकारच्या ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत सोमवार ८ जूनपासून मुंबईच्या रस्त्यांवर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट बस पुन्हा धावणार आहेत. तब्बल अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळाहून बेस्ट बसची सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतरांसाठी पूर्णपणे बंद होती.

येत्या ८ जूनपासून खासगी कार्यालयं १० टक्के मनुष्यबळासह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुलभपणे ये-जा करता यावी म्हणून

राज्य सरकारने जारी केलेल्या सुधारीत मार्गदर्शक नियमावलीनुसार मुंबई महानगर परिसर प्रवासाला देखील मुभा देण्यात आली आहे. याचाच अर्थ मुंबईसहीत, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, नवी मुंबई, पनवेल परिसरातील कुठल्याही कर्मचाऱ्याला कामानिमित्त प्रवास करता येणार आहे. त्याच जोडीला बेस्ट बसची सुविधा मिळाल्यास या कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचणं सोपं होणार आहे.

यासंदर्भात बेस्ट प्रशासनाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मनोज वऱ्हाडे यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना सांगितलं की, सध्याच्या घडीला लोकल ट्रेनची सेवा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत बेस्ट प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना सोमवारपासून सेवा देण्याचं ठरवलं आहे. सोमवारपासून खासगी कार्यालयं देखील १० टक्के मनुष्यबळासह सुरू होत आहेत. अशा प्रवाशांना आपलं ओळखपत्र दाखवून बेस्टचा प्रवास करता येऊ शकेल. 

कार्यालय आणि दुकाने चालवणाऱ्यांना बेस्ट बसच्या सेवेमुळे दिलासा मिळेल. सोमवारपासून किती प्रवासी बेस्ट बसच्या सेवेचा लाभ घेतील, त्यानुसार बसची संख्या वाढवण्याचं ठरवण्यात येईल. कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन लहान मुलांना सध्या तरी बेस्ट बसमधून प्रवासाला मनाईच असेल, असंही वऱ्हाडे यांनी स्पष्ट केलं. 

कोरोना रुग्णांच्या सोईसाठी ७० बेस्ट बसचं रुपांतर अँब्युलन्समध्ये करण्यात आलं होतं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा