SHARE

मुंबई - रात्री शेवटची लोकल चुकल्यास चाकरमान्यांना पहाटेच्या पहिल्या लोकलची वाट पाहावी लागते. मात्र आता या प्रवाशांकरीता रात्रीची बेस्ट बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची रेल्वे फलटांवरील रात्रपाळी वाचणाराय.

बेस्ट परिवहन विभागानं १ डिसेंबरपासून रात्री प्रवास करणाऱ्यांसाठी दादर स्थानक ( पूर्व ) स्वामी नारायण मंदिर इथून गोराई, ओशिवरा, मुलुंड (पश्चिम) आणि कोपरखैराणे करिता विशेष बससेवा चालवण्याचा निर्णय घेतलाय. रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी 202 नंबरची बेस्ट दादर स्थानक पूर्व ते गोराई आगार दरम्यान धावेल. त्याचप्रमाणे 2 वाजून 25 मिनिटांनी दादर स्थानक पूर्व ते ओशिवरा आगार दरम्यान 4 मर्यादित मार्गावर विशेष बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.

तर दादरहून मुलुंडला जाण्यासाठी 2 वाजून 30 मिनिटांनी मुलुंड स्थानक ( पश्चिम ) इथून एक बस सुटणाराय. नवी मुंबईत जाण्यासाठी पहाटे 4 वाजता दादर स्थानक पूर्व इथून कोपरखैराणेसाठी 521 मर्यादित विशेष बस सेवा सुरू केलीय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या