Advertisement

२०२३ पासून बेस्टची डबलडेकर होणार बंद


२०२३ पासून बेस्टची डबलडेकर होणार बंद
SHARES

अनेक वर्षांपासून मुंबईकरांच्या सेवेत असलेली बेस्टची डबलडेकर बस आता इतिहासजमा होणार आहे. डबलडेकर बसचा खर्च जास्त असल्यानं आणि मुंबईतील रास्त्यांवरील जागा कमी झाल्यामुळे २०२३ पासून या बस बंद करण्याचा निर्णय 'बेस्ट'ने घेतला आहे.


१९३७ मध्ये झाल्या सुरू

बेस्टच्या या बस मुंबईमध्ये १९३७ मध्ये सुरू करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून या बसना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती. मुंबईतील प्रवाशांनी या बसने प्रवास करण्याला कायम प्राधान्य दिलं. या बसची संख्या सुरुवातीला कमी होती. त्यानंतर १९४८ च्या दरम्यान ती १४१ पर्यंत गेली. तर १९९३ पर्यंत ही संख्या ८८२ इतकी झाली होती.

शहरातील ७ मार्गांवर सध्या १२० बसेस कार्यरत आहेत. यामधील ७२ बसेस २०२० च्या पर्यंत बंद करण्यात येणार आहेत. तर उर्वरित ४८ बसेस २०२३ मध्ये बंद करण्यात येणार आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा