Advertisement

बेस्ट उपक्रमासाठी ८०० कोटी; महापालिका अर्थसंकल्पात घोषणा

गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक तोटा सहन करणाऱ्या बेस्टला दिलासा देण्यासाठी महापालिका प्रशासन पुन्हा एकदा सरसावलं आहे.

बेस्ट उपक्रमासाठी ८०० कोटी; महापालिका अर्थसंकल्पात घोषणा
SHARES

गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक तोटा सहन करणाऱ्या बेस्टला दिलासा देण्यासाठी महापालिका प्रशासन पुन्हा एकदा सरसावलं आहे. बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ६ हजार ६५० कोटी रुपये देण्याची तयारी महापालिकेच्या महासभेत दाखविण्यात आली. 

प्रत्यक्षात २०२२-२३ या आर्थिक वर्षात केवळ ८०० कोटी रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. हा निधी गतवर्षीच्या तुलनेत केवळ ५० कोटी अधिक आहे. त्यामुळे यंदाही बेस्ट उपक्रमाच्या पदरात निराशाच पडण्याची चिन्हे आहेत.

आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला महापालिकेने गेल्या ३ - ४ वर्षांत अनुदान व कर्ज स्वरुपात ३ हजार कोटी रुपये दिले आहेत. मात्र, कोविड काळात नुकसान वाढले, त्यामुळे बेस्टला वाचविण्यासाठी ६६५०.४८ कोटी रुपये अनुदान देण्याची मागणी बेस्ट समितीकडून करण्यात आली होती.

ही मागणी स्वीकारून पालिकेच्या महासभेनेही याबाबत पुढील कार्यवाहीबाबत स्थायी समितीला कळविले होते. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात बेस्ट उपक्रमाला दिलासा देण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा