SHARE

मुंबई – बेस्टच्या 50 एसी बस लवकरच लिलावात काढण्यात येणार आहेत. जीर्ण झालेल्या या बस मोडीत काढण्याचा प्रस्ताव गुरूवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. बेस्ट सदस्यांनी मात्र एसी बस मोडीत काढण्यास विरोध केलाय. या बसचा लिलाव करण्याचा प्रस्ताव पुढे आणला. त्यानुसार समितीत लिलावाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. बेस्टने 282 एसी बस खरेदी केल्या असून त्यातील अंदाजे 106 बसच रस्त्यावर धावतात. तर ज्या बस धावतात त्यांची दुरावस्था झाली आहे. या बेस्टच्या देखभालीवर आणि व्यवस्थापनावर गेल्या पाच वर्षात अंदाजे 400 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्या तुलनेत केवळ 80 कोटी रुपयांचाच महसुल मिळालाय. त्यामुळे एसी बसचा पांढरा हत्ता का पोसावा असे म्हणत बेस्टने एसी बसेस हळहळू मोडीत काढण्याचा प्रस्ताव आणला आहे. मात्र जेएनआरयूएमद्वारे हा बस खरेदी करण्यात आल्याने त्या मोडीत काढता येत नसल्याने त्याचा लिलाव करण्याचे ठरवत त्याला मंजुरी देण्यात आली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या