Advertisement

बेस्ट नव्या ४ हजार इलेक्ट्रिक बस खरेदी करणार

मुंबईत प्रवाशांना स्वस्त दरात वाहतुक सुविधा देणाऱ्या बेस्ट प्रशासनाने हे आपल्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस वाढविण्यावर भर दिला आहे.

बेस्ट नव्या ४ हजार इलेक्ट्रिक बस खरेदी करणार
SHARES

मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळं पर्यावरणाची हानी होत आहे. त्यामुळं पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या गाड्या न चालवता इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर करावा असे आव्हान राज्य सरकारकडून यापूर्वीच करण्यात आलं आहे. अशातच आता मुंबईत प्रवाशांना स्वस्त दरात वाहतुक सुविधा देणाऱ्या बेस्ट प्रशासनाने हे आपल्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस वाढविण्यावर भर दिला आहे.

येत्या काही वर्षात बेस्टच्या ताब्यात ४ हजार इलेक्ट्रिक बसेसचा ताफा असणार आहे. इंधन दरवाढीला पर्याय व पर्यावरण पूरक प्रवासासाठी बेस्टकडून हा निर्णय घेतला आहे. त्याबाबत विविध स्तरावर नियोजन करण्यात येत असल्याचं समजतं.

गेल्या काही वर्षांपासून इंधन दरवाढ सातत्याने होत आहे. त्याचा मोठा फटका बेस्ट उपक्रमाला बसत आहे. प्रवाशांना त्याचा भुर्दंड बसू नये यासाठी भविष्यात इलेक्ट्रिक बसवर अधिकाधिक वापर  करण्याचे  बेस्टने ठरवले आहे. सध्या बेस्ट वापरत असलेल्या डिझेलच्या फेऱ्यांचा खर्च प्रति किलोमीटर ४० रुपये आहे. तर सीएनजीवर चालणाऱ्या बसचा प्रवर्तन खर्च प्रति किमी २६ रुपये आहे. तर इलेक्ट्रिकवर बसगाड्यांचा प्रवर्तन  प्रति किमी ९ रुपये इतका खर्च येतो.

इलेक्ट्रिक बसमुळे शहरातील प्रदूषण कमी होऊन मुंबईकराना चांगली आणि किफायतशीर बससेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्यानुसार डिझेलवरील बसेस या  सीएनजीवर किंवा इलेक्ट्रिकवर चालवण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यासाठी किती खर्च येईल, तसेच या बसगाड्यांची किंमत याच्या आकडेवारीचा बेस्ट प्रशासन विचार करीत आहे.

या बसची स्थिती, भविष्यातील कार्यक्षमता आदीचा तांत्रिक अभ्यास करण्यात येत आहे. त्यासाठी येणाऱ्या खर्चाची आकडेवारी व अहवाल निश्चित आल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्यामध्ये आणखी ४००० वातानुकूलित इलेक्ट्रिक बस गाड्या बेस्टच्या ताफ्यामध्ये समाविष्ट केल्या जातील, तर पुढील पाच वर्षांच्या कालावधीमध्ये बेस्टचा एकूण बस ताफा १०,००० इतका असेल.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा