Advertisement

बेस्टच! आता मुंबईच्या 'या' मार्गांवर धावणार AC बस

बेस्टनं आपल्या काही लोकप्रिय मार्गांवरील नॉन-एसी बसना एसी बसमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

बेस्टच! आता मुंबईच्या 'या' मार्गांवर धावणार AC बस
(Representational Image)
SHARES

अधिक रहदारी असलेल्या मार्गांवर आता एसी बसेस धावण्याची शक्यता आहे. प्रवाशांच्या सूचना आणि मागण्यांच्या अनुषंगानं बेस्टनं आपल्या काही लोकप्रिय मार्गांवरील नॉन-एसी बसना एसी बसमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, मार्ग आणि बसस्थानक समान राहतील, असं बेस्ट प्रवक्त्यांनी सांगितलं.


नवीन एसी बसचे क्रमांक

  • सीएसएमटी ते बॅकबे डेपो बस मार्गावरील १३८ वातानुकूलित करून ए -१३८ करण्यात आली आहे. सीएसएमटीहून पहिली बस सकाळी ६.०५ वाजता आणि शेवटची बस रात्री ११.४२ वाजता सुटेल.
  • बॅकबे डेपो आणि शिवडी बस मार्ग क्रमांक १३४ चे नाव ए १३४ एसी बस सेवा असे करण्यात आले. बॅकबे इथून पहिली बस पहाटे ५.२५ वाजता आणि शेवटची बस रात्री ८.३५ वाजेपर्यंत धावेल.
  • नेव्ही नगर आणि चर्चगेट बस मार्ग क्रमांक १३७ चा ए १३७ करण्यात आली आहे. नेव्ही नगरहून पहिली बस सकाळी ६.३० वाजता आणि शेवटची बस रात्री १०.५० वाजता असेल.
  • आरसी चर्च ते कमला नेहरू पार्क मार्ग क्रमांक १०६ एसी करण्यात आली आहे. त्याचे नाव बदलून ए १०६ असं करण्यात आलं. आर सी चर्चकडून पहिली बस सकाळी ६.०५ वाजता आणि शेवटची बस सोमवारी ते शनिवारी रात्री ८.४० वाजता असेल.हेही वाचा

लवकरच मुंबईत धावणार विनाचालक मेट्रो

अपघातमुक्त सेवा देण्यासाठी एसटीचे चालक कटिबद्ध

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा