Advertisement

मुंबईत धावणार इलेक्ट्रिक बसगाड्या


मुंबईत धावणार इलेक्ट्रिक बसगाड्या
SHARES

आधीच तोट्यात असलेल्या बेस्टने कोट्यवधी रुपये खर्चून 6 इलेक्ट्रिक बसची खरेदी केली आहे. शुक्रवारी वडाळा आगारात या बसचे लोकापर्ण होणार आहे.


वाढत्या प्रदूषणावर आळा बसणार?

खरेतर वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाने ही नवीन शक्कल लढवली आहे. विशेष म्हणजे हे बस कोणत्याही प्रकारचे इंधन किंवा वायूवर चालणारे नाही. त्यामुळे प्रदूषणाला आळा तर बसेल. पण या एका बसची किंमत ही इतर बेस्ट बसच्या तुलनेत तीन पटींनी जास्त आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने केलेल्या या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


चार्जिंगवर चालणार बस

वडाळा आगारत शुक्रवारी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर ही बस दक्षिण मुंबईतील रस्त्यावर धावणार आहे. सध्या सहा पैकी चार बसेस या कुलाबा येथील आगारामध्ये दाखल झाल्या आहेत. या बसेस चार्जिंगवर चालणार आहेत. चार्जिंग पूर्ण झाल्यावर ही बस २०० किमी धावू शकेल. हे एकमेव चार्जिंग पॉंईंट फक्त कुलाबा आगारात आहे. पण जर मुंबईतल्या वाहतूककोंडीत जर बस मध्येच बंद पडली तर काय होणार? हा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.


या बसचा मार्ग असा असेल

  • मार्ग क्रमांक 138 (बॅकबे डेपो-सीएसएमटी)
  • स्पेशल -2 (सकाळी, सीएसएमटी-वर्ल्ड ट्रेड सेंटर)
  • 112 (संध्याकाळी, गेटवे ऑफ इंडिया-चर्चगेट स्टेशन)
  • विशेष 9 (एनसीपीए मार्ग ते अहिल्याबाई होळकर चौक)
  • 100 (अहिल्याबाई होळकर चौक, फ्री प्रेस जर्नल)
  • फोर्ट फेरी-1 (आरएसआय/ एनसीपीए मार्ग ते सीएसएमटी)
  • फोर्ट फेरी -2 (चर्चगेट/ एनसीपीए मार्ग ते सीएसएमटी)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा