Advertisement

बेस्ट उपक्रमाच्या 'चलो' ॲपवर आता युनिव्हर्सल पास

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी सहज व्हावा यासाठी बेस्ट आतापर्यंत अनेक उपक्रम राबवत आली आहे.

बेस्ट उपक्रमाच्या 'चलो' ॲपवर आता युनिव्हर्सल पास
(Representational Image)
SHARES

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी सहज व्हावा यासाठी बेस्ट आतापर्यंत अनेक उपक्रम राबवत आली आहे. नुकताच 'चलो' अॅप लॉंच करण्यात आलं. या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुक करत येणार आहे. अशातच आता बेस्ट उपक्रमानं आता २० जानेवारी पासून युनिव्हर्सल पास या ॲपवर जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी २ डोस घेतलेल्या नागरिकांना बेस्टच्या बसगाड्यांमधून प्रवास करण्याची अनुमती आहे. यावेळी बसचालक व वाहक युनिव्हर्सल पास तपासत असल्याने ॲपवरील ही सुविधा प्रवाशांना दिलासादायी ठरणार आहे.

कोरोना काळातील निर्बंध शिथिल झाल्यानंतर बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधील दररोजची प्रवाशी संख्या २८ लाखांवर पोहोचली. बेस्ट आर्थिक संकटात असल्याने प्रवाशी संख्या वाढविण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

त्यानुसार काही दिवसांपूर्वी बेस्टने ७२ विविध बसमार्गांवर सुपर सेव्हर योजना आणली. चलो ॲपच्या माध्यमातून एका प्रवासाचे तिकीट किंवा मासिक पास खरेदी केल्यानंतर मोबाईलवरील त्याचा कोड स्कॅन करुन प्रवास करता येत आहे.

प्रवाशांनी तिकीट खरेदी करण्यासाठी चलो मोबाईल ॲपचा वापर केल्यानंतर तो युनिव्हर्सल पास सोबतही जोडला जाणार आहे. त्यामुळे त्याची पडताळणी तिकीट मशीनद्वारे आपोआप होत असल्याने प्रवाशांना युनिव्हर्सल पास सोबत बाळगण्याची गरज नसल्याचे बेस्ट प्रशासन स्पष्ट केले आहे.

मात्र पैसे देऊन आणि स्मार्ट कार्डद्वारे तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना युनिव्हर्सल पास बस वाचकाला दाखवणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे बेस्टचे चलो मोबाईल ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा