Advertisement

मेट्रो 2A आणि 7 च्या प्रवाशांसाठी बेस्ट 20 जानेवारीपासून 'या' मार्गांवर धावणार

नवीन मुंबई मेट्रो मार्गाचा वापर करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुलभ करण्यासाठी बेस्ट ने या बस सुरू केल्या आहेत.

मेट्रो 2A आणि 7 च्या प्रवाशांसाठी बेस्ट 20 जानेवारीपासून 'या' मार्गांवर धावणार
SHARES

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 19 जानेवारी, गुरुवार रोजी गुंदवली मेट्रोपासून धावणाऱ्या नवीन मुंबई मेट्रो (Mumbai metro) लाइन 2A आणि लाइन 7 चे उद्घाटन करतील. 2A (Metro 2A) ही लाईन दहिसर ते अंधेरी पश्चिमेतील DN नगर पर्यंत धावेल आणि लाईन 7 (Metro 7) ही दहिसर पूर्व ते गुंदवली, अंधेरी पूर्व पर्यंत धावेल.

नवीन मुंबई मेट्रो मार्गाचा वापर करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुलभ करण्यासाठी, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग (BEST) 20 जानेवारी 2023 पासून मेट्रो स्थानकांना जोडणारे फीडर मार्ग सुरू करणार आहे.

मेट्रो 2 ए साठी

बस मार्ग A 295:

शांती आश्रम ते चारकोप दरम्यानची ही रिंग-रूट बस अक्सर, बोरिवली मेट्रोरेल स्टेशन, गोराई डेपो, पहाडी अक्सर मेट्रो रेल्वे येथे थांबेल. पहिली बस सकाळी ७ वाजता सुटणार असून शेवटची बस रात्री साडेदहा वाजता शांती आश्रम इथून सुटेल.

मेट्रो 7A साठी

बस मार्ग A 283:

ही बस दिंडोशी बस स्थानकावरून सुटेल आणि मेट्रो 7 दिंडोशी, कुरार, आकुर्ली मेट्रोरेल येथे थांबेल आणि शेवटचा थांबा दामू नगर असेल.

पहिली बस दिंडोशी बस स्थानकातून सकाळी साडेसहा वाजता निघेल आणि शेवटची बस रात्री दहाच्या सुमारास सुटेल. दुसरी बस दामूनगर येथून सकाळी ७.०० वाजता सुटेल आणि शेवटची बस रात्री साडेदहा वाजता सुटेल.

मेट्रो 2A आणि मेट्रो 7A साठी

बस मार्ग A216:

ही बस मेट्रो 2A आणि मेट्रो 7 च्या NL कॉम्प्लेक्स, दहिसर (E) येथून निघेल आणि मेट्रो 7 ओवरीपाडा, नॅशनल पार्क मेट्रोरेल स्टेशन ते बोरिवली स्टेशन पर्यंत जाईल.

पहिली बस बोरिवली बस स्थानकातून सकाळी 6.30 वाजता सुटेल आणि शेवटची बस रात्री 10 वाजता सुटेल. दुसरी बस सरस्वती संकुल येथून सकाळी 07:00 वाजता निघेल आणि शेवटची बस रात्री 10:30 च्या सुमारास सुटेल.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा