Advertisement

बेस्टच्या मदतीसाठी आलेल्या एसटी महामंडळाच्या ताफ्याला महापालिकेनं दिले ३० कोटी

लॉकडाऊनपासून बेस्ट उपक्रम मुंबईकरांना सेवा देत आहेत. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर बेस्ट प्रवास खुला झाल्यानंतर सेवेवरील ताण वाढला.

बेस्टच्या मदतीसाठी आलेल्या एसटी महामंडळाच्या ताफ्याला महापालिकेनं दिले ३० कोटी
SHARES

काही दिवसांपूर्वी बेस्टनं (best) मुंबईकरांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाच्या (msrtc) एसटीची मदत घेतली होती. त्यानुसार बेस्ट उपक्रमाच्या सहाय्यासाठी पाठविलेल्या एसटी महामंडळाच्या ताफ्यासाठी महापालिकेनं (bmc) आतापर्यंत ३० कोटी ७४ लाखांहून अधिक मोबदला मोजल्याची माहिती समोर येत आहे.

लॉकडाऊनपासून बेस्ट उपक्रम मुंबईकरांना सेवा देत आहेत. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर बेस्ट प्रवास खुला झाल्यानंतर सेवेवरील ताण वाढला. तेव्हा बेस्टमधील गर्दी पाहून एसटी महामंडळाच्या ताफ्यातील बससेवाही उपलब्ध करण्यात आल्या. मात्र, या सेवांसाठी येणाऱ्या खर्चाचा भार मुंबई महापालिकेवर टाकण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेने एसटी महामंडळास ही रक्कम दिली.

बेस्ट बसमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटीकडून हजार बसचा ताफा पाठविण्याची घोषणा करण्यात आली. बेस्ट उपक्रमाची आर्थिक क्षमता रोडावल्याने या खर्चाचा भार महापालिकेवर आला आहे. त्यात एसटीच्या प्रत्येक बससाठी प्रतिकिमी ४४ रुपये इतका दर आकारण्यात आला आहे. एसटीची सेवा २१ मेपासून घेण्यात आली असून २ जुलैपर्यंत सुमारे ५० लाख किमी इतके अंतर झाले आहे.

त्यासंदर्भात बेस्टकडे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता अन्य प्रवाशांकडून भाड्यापोटी ५ कोटी ५९ लाखांवर रक्कम मिळाली आहे. त्याप्रमाणे ६ मे ते ३ जुलैपर्यंत ९ कोटी ६५ लाख आणि २१ मे ते २ जुलैसाठी १६ कोटी नऊ लाखांवरील रक्कम मिळून ३० कोटी ७४ लाख रुपये महामंडळास देण्यात आले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा