Advertisement

मुंबई महापालिकेची 'दोन चाकी' आयडिया

काळाच्या ओघात जवळपास इतिहासजमा झालेल्या सायकलला आता मुंबईत चांगले दिवस येण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेची 'दोन चाकी' आयडिया
SHARES

हाताच्या बोटावर मोजावीत इतकीच मंडळी हल्ली सायकल चालवतात. चालवणारे कोण तर मुंबईतले डबेवाले. ते सोडले तर सायकल ही तशी इतिहासजमाच होण्याच्या मार्गावर आहे. पण काळाच्या ओघात जवळपास इतिहासजमा झालेल्या सायकलला आता मुंबईत चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं एक महत्वाकांक्षी योजना हाती घेतलीय.

सायकल अॅप

वर्दळीच्या वेळी बस, टॅक्सीसाठी ताटकळत उभं राहाणं मुंबईकरांसाठी काही नवं नाही. अशावेळी सायकल घ्या आणि निश्चित स्थळी पोहोचा अशी ही सुविधा असेल. या योजनेनुसार मुंबईत सार्वजनिक सायकलची सुविधा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. यात खाजगी कंपन्या त्यांच्या सायकल अॅपवर मुंबईकरांना उपलब्ध करून देणार आहेत. ॲपवरून पैसे दिले की, तुम्हाला सायकल मिळणार आणि तुमच्या निश्चित स्थळी गेल्यावर ती तिथल्या सायकल स्टँडवर ठेवून द्यायची अशीही सुविधा असेल.

पालिकेची मुंबईकरांसाठी सुविधा

सीएसटी आणि मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक वास्तू समोरच ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वी ही सुविधा बीकेसी परिसरात आधीच सुरू करण्यात आली होती. परंतु तो खाजगी संस्थेद्वारे करण्यात आलेला प्रयोग होता. आता मात्र मुंबई महापालिका स्वतः ही सुविधा मुंबईकरांसाठी सुरू करते आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिलेल्या माहिती नुसार येत्या पंधरा दिवसातच ही सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

आरोग्यासाठी सायकलिंग फायदेशीर

महापालिका आयुक्त स्वतः रोज सकाळी सायकल चालवतात. आता हीच सवय मुंबईकरांना करून देण्याचा प्रयत्न महापालिकेमार्फत केला जाणार आहे. त्याला प्रतिसाद कसा मिळतो? हे पाहाणं महत्वाचं असेल. कारण बीकेसीप्रमाणेच ठाणे परिसरातही या योजनेला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मुंबईतली ही योजना कशा पद्धतीनं लागू होते हे पहावं लागेल. त्याचा वापर जास्तीत जास्त तरुणांनी करावा अशी महापालिकेला अपेक्षा आहे.हेही वाचा

'हाॅर्न नाॅट ओके प्लिज' द पनिशिंग सिग्नलचा मुंबईत बोलबाला

सर्व पायाभूत सुविधा प्रवाशांना देण्यात याव्यात- अनिल परब

संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा