Advertisement

बेस्ट चालकांच्या संपाला वाढता पाठिंबा, १८ डेपोंमधील बस सेवा विस्कळीत

बेस्टच्या कंत्राटी चालकांच्या संपाचा हा तिसरा दिवस आहे.

बेस्ट चालकांच्या संपाला वाढता पाठिंबा, १८ डेपोंमधील बस सेवा विस्कळीत
SHARES

बेस्ट बसच्या कंत्राटी चालकांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. 

आज दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी खाजगी बस पुरवठा कंत्राटदार यांच्या कामगारांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनास्तव सकाळी 9 वाजे पर्यंत एकूण 1375 बस गाडया प्रवर्तित झाल्या नाहीत.

आजच्या आंदोलनात SMT, मातेश्वरी, टाटा, हंसा, ओलेक्ट्रा, आणि switch या व्यवसाय संस्थेच्या कामगारांचा समावेश आहे. असे असले तरी SMT, मातेश्वरी, हंसा या व्यवसाय संस्थेच्या  अनुक्रमे 76, 35 आणि 162 बस गाड्या प्रवर्तित करण्यात आल्या आहेत.

उपरोक्त व्यवसाय संस्थे विरुद्ध कंत्राटीच्या अटी व शर्ती  प्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच त्यांना त्वरित त्यांच्या कामगारांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

बेस्ट उपक्रम आपल्या जास्तीत जास्त बस चालकांचा वापर करून जास्तीत जास्त बस गाडया प्रवर्तित करीत आहेत जेणे करून प्रवाश्यांना बस सेवा उपलब्ध करता येईल.

काम बंद आंदोलना मुळे  बॅकबे, कुलाबा, मुंबई सेंट्रल, वरळी, प्रतिक्षा नगर, आणिक, धारावी, काळाकिल्ला, देवनार, शिवाजी नगर, घाटकोपर, मुलुंड, मजास, सांताक्रूझ, ओशिवरा, मालवणी, गोराई आणि मागाठणे अश्या एकूण 18 आगारांच्या बस गाड्या प्रवर्तनावर फरक पडला.

आज दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये एकूण स्वतःच्या मालकीच्या 1390 आणि  wet lease च्या 1671 अश्या एकूण 3061 बस गाड्या आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा