Advertisement

लेबर कॅम्पमधील बसथांबा दुरवस्थेत


लेबर कॅम्पमधील बसथांबा दुरवस्थेत
SHARES

माटुंगा लेबर कॅम्पच्या 60 फूट रोडवर असलेल्या बेस्टच्या 164,166 क्रमांकाच्या बसथांब्याची दुरवस्था झाली आहे. या बस थांब्यासमोर कित्येक महिन्यांपासून वाहने उभी आहेत. या थांब्यावर प्रवाशांना बसायलाही जागा नसल्याने प्रवाशांना नाईलाजाने रस्त्यावर उभे राहून बसची वाट पहावी लागत आहे.

बस थांब्याचा आवारात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. पेव्हर ब्लॉक निघून इतरत्र विखुरलेले आहेत. त्यामुळे कडाक्याचे ऊन असूनही थाब्यांचा आसरा कसा घ्यायचा? असा प्रश्न विलास पाटील या प्रवाशाने केला. ते म्हणाले, वयोवृद्ध असूनही आम्हाला बसची वाट पाहत रस्त्यावर अर्धा ते एक तास उभे राहावे लागते. थांबा असूनही त्याचा बसण्यासाठी वापर करता येत नाही. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे.

बऱ्याचदा या थांब्याचा ताबा प्रवाशांऐवजी नशेखोरांनी घेतलेला दिसतो. त्यांनी केलेल्या घाणीमुळे प्रवाशांना थांब्याजवळ उभे राहणेदेखील मुश्कील झाले आहे.

बेस्ट प्रशासनाने या समस्येकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे व हा बसथांबा प्रवाशांना बसण्यायोग्य बनवावा. बस थांब्यासमोरील वाहने त्वरित हटवण्यात यावीत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी दादरच्या वीर कोतवाल उद्यान येथील बस थांबा फूटपाथचे काम सुरु असताना उखडून पडल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत एक मुलगी देखील जखमी झाली होती. लेबर कॅम्पमधील हा बसथांबा देखील असाच धोकादायक झाल्याचे चित्र दिसत आहे.

[हे पण वाचा -  दादरमध्ये बसस्टॉप पडल्याने मुलगी जखमी]

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा