Advertisement

भायखळा रेल्वे स्थानकाला जागतिक पातळीवर युनेस्कोचा पुरस्कार

भारतीय रेल्वेमधील सर्वाधिक जुन्या स्थानकांपैकी एक भायखळा स्थानक आहे.

भायखळा रेल्वे स्थानकाला जागतिक पातळीवर युनेस्कोचा पुरस्कार
SHARES

मध्य रेल्वेच्या १६९ वर्ष जुन्या भायखळा रेल्वे स्थानकांच्या ऐतिहासिक वास्तूंची रचना आणि बांधकाम याची दखल जागतिक पातळीवर घेतली आहे. 'सांस्कृतिक वारसा संवर्धन-२०२२ साठी युनेस्कोकडून भायखळा रेल्वे स्थानकाला आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संरक्षण पुरस्कार जाहीर झाला आहे.

गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत या स्थानकाचे पुनर्संचयनाचे काम उत्कृष्ट आणि दर्जात्मक केल्याने युनेस्कोकडून हा पुरस्कार दिल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

भारतीय रेल्वेमधील सर्वाधिक जुन्या स्थानकांपैकी एक भायखळा स्थानक आहे. या स्थानकाला मागील तीन वर्षांपासून हेरिटेज संदर्भातील कामे करण्यात आली आहे.

हेरिटेज बांधकामाच्या सुशोभीकरणाचे काम प्रसिद्ध वास्तूविशारद आभा लांबा यांनी केले आहे. भाजप नेत्या शायना एनसी यांच्या नेतृत्त्वात आणि बजाज ग्रुप चॅरिटेबल ट्रस्टच्या सहाय्याने ‘आय लव्ह मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने हे काम केले आहे.

भायखळा रेल्वे स्थानकाच्या प्राचीन वारसा वास्तुकला पुर्नजिवित करण्यासाठी जुलै, २०१९ सुरू करण्यात आले होते. या स्थानकाच्या १८ महिन्यांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, कोरोना महामारीमुळे तीन वर्षे लागली.

भायखळा स्थानकाचे काम हे दोन टप्प्यात करण्यात आले. पहिल्या टप्प्यात नक्षी, दरवाजे, खिडक्या, छत, भिंती यांचा कायापालट करण्याची कामे केली. तर, दुसऱ्या टप्प्यात छत, छप्पर, स्थानकातील फलाट क्रमांक एकची दुरूस्ती, स्थानक प्रबंधक, आरपीएफ यांच्या कार्यालयाचे काम पूर्ण करण्यात आले.

कामाच्यावेळी प्रत्येकबाब शास्त्रशुद्ध पद्धतीनुसार करण्यात आली आहे.रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती-गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत या स्थानकाचे पुनर्संचयनाचे काम उत्कृष्ट आणि दर्जात्मक केल्याने युनेस्कोचा आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संरक्षण पुरस्कार या स्थानकाला प्राप्त झाला आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करुनया यासंदर्भात माहिती दिली.१६२ वर्षांनी सौदर्यीकरण -भायखळा रेल्वे स्थानक १८५३ साली लाकडाचे स्थानक होते. त्यानंतर १८५७ स्थानकाला नवीन झळाळी देण्यात आली. आता स्थानकाच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्यात आलेला आहे. १६२ वर्षांनी सौदर्यीकरण करण्यात आले आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा