Advertisement

Coronavirus Updates: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवासीसंख्येत १७ लाखांची घट

सरकराच्या नागरिकांनी घरून काम करावं या निर्णयानंतर मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वेला बसला आहे.

Coronavirus Updates: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवासीसंख्येत १७ लाखांची घट
SHARES

कोरोना व्हायरसमुळं नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारनं खाजगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचं आवाहनं केलं आहे. कोरोना हा संसर्गजन्य असल्यानं त्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला. सरकराच्या या निर्णयानंतर नागरिकांनी घरून काम करणं पसंत केलं. मात्र, याचा फटका आता मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वेला बसला आहे. मंगळवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवासीसंख्येत १७ लाखांची घट झाली आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी घरून काम तसंच कार्यालयांत ५० टक्के उपस्थिती असे पर्याय देण्यात आल्यानंतर मंगळवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवासीसंख्येत १७ लाखांची घट झाली आहे. दररोज ८० ते ९० लाख प्रवासीसंख्या असलेल्या लोकलवरील ही घट अद्याप पुरेशी नसली तरी, कोरोनाच्या धास्तीमुळं रेल्वेप्रवास टाळण्यात येत असल्याचं दिसून येत आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्यानं कोरोनाच्या संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. मध्य व पश्चिम दोन्ही मार्गावरून दररोज ८० ते ९० लाख प्रवासी प्रवास करतात. सरकारी, खासगी कार्यालयात जाणारे विद्यार्थी, मालवाहक, दिव्यांग, डबेवाले अशा प्रवाशांची भर त्यात असते. त्यामुळं गर्दी कमी न झाल्यास लोकल बंद करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावा लागला होता.

१६ मार्चला रेल्वेनं ९० लाख १७ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. यात पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्यांमधून ४० लाख ७५ हजार ७०५ आणि मध्य रेल्वेवरील मुख्य मार्ग, हार्बर, ट्रान्स हार्बर वरील लोकलमधून ४९ लाख ४१ हजार ५६४ प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद आहे.

१७ मार्चला या प्रवासी संख्येत घट झाली. पश्चिम रेल्वेवरून १७ मार्चला ३२ लाख ६० हजार ८७८ प्रवाशांनी आणि मध्य रेल्वेवरून ३९ लाख ७७ हजार ३२१ प्रवाशांची नोंद झाली आहे. एका दिवसात ९० लाखांपैकी १७ लाख ७९ हजार प्रवासी कमी झाले आहेत.



हेही वाचा -

Coronavirus Updates: 'या' १० खाजगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू

Corona Virus कोरोना विलगीकरणाचा शिक्का असताना केला रेल्वेतून प्रवास



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा