Advertisement

Coronavirus Updates: 'या' १० खाजगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू

राज्य सरकारनं खबरदारी घेत कस्तुरबासह जसलोक, लीलावती, एच.एन. रिलायन्स यांसारख्या खासगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. त्या

Coronavirus Updates: 'या' १० खाजगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू
SHARES

कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात अधिक वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे. कोरोनाच्या संशयित रुग्ण दिवसेंदवस वाढ असल्यानं राज्य सरकारनं खबरदारी घेत कस्तुरबासह जसलोक, लीलावती, एच.एन. रिलायन्स यांसारख्या खासगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळं आता खासगी रुग्णालयांमध्येही उपचार घेणे शक्य होणार आहे. तसंच, यात ९० खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या आणि गंभीर प्रकृतीच्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग, कृत्रिम श्वसनयंत्रणा इत्यादी सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं या सुविधेचं विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. १० खासगी रुग्णालयांनी यासाठी पुढाकार घेत ९० खाटा उपलब्ध करून दिल्या आहेत.

या रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्याची प्रक्रिया २ ते ३ दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती मिळते. रुग्णालयांच्या विलगीकरण कक्षांमध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घेतली जावी, काय सेवा उपलब्ध असाव्यात, उपचार कसं द्यावेत याची मार्गदर्शक तत्त्वं या रुग्णालयांना दिलेली आहेत. यातील काही धर्मादाय रुग्णालयं मोफत सेवा देणार आहेत.

खासगी रुग्णालयांमध्ये दर आकारले जातील. किती दर आकारावेत, याबाबत अजून रुग्णालय प्रशासनाची चर्चा सुरू असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, सेव्हन हिल्स रुग्णालयातही एका मजल्यावर अतिदक्षता विभागासह कृत्रिम श्वसनयंत्रणेसह सुविधा उपलब्ध करण्यासाठी खासगी रुग्णालयाचा पर्याय पालिका धुंडाळत आहे. यासाठी जसलोकसह अन्य ३ रुग्णालयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यावर विचार केला जात आहे. या सेवेचे व्यवस्थापनासह सर्व या रुग्णालयांकडून केले जाईल, अशी माहिती मिळते.

रुग्णालयाचं आणि खाटांची संख्या

  • जसलोक – ५
  • एच.एन.रिलायन्स – २
  • हिंदुजा – २०
  • कोकिळाबेन – १७
  • रहेजा – १२
  • जगजीवन राम पश्चिम रेल्वे – १०
  • गुरुनानक – २
  • सेंट एलिझाबेथ – २
  • बॉम्बे – ४
  • लीलावती – १५



हेही वाचा -

Coronavirus Updates: गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

Coronavirus Updates: बसगाड्यांमधून उभ्यानं प्रवास करू नये, बेस्टचं प्रवाशांना आवाहन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा