Advertisement

मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड


मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड
SHARES

कल्याण आणि विठ्ठलवाडी स्टेशनदरम्यान सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक तब्बल पाऊणतास ठप्प झाली. 

मात्र परिणामस्वरूप मुंबई आणि कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. लोकलच्या एका मागोमाग एक रांगा लागल्या होत्या. तर बराच वेळ होऊनही गाडी चालत नसल्याने अनेक प्रवाशांनी उतरून चालत जाणे पसंत केले.


प्रवासी हैराण

या तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. पण, तरीही हा बिघाड दुरुस्त व्हायला पाऊण तास लागला. त्यामुळे केवळ लोकल वाहतुकीवरच नव्हे तर मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांवरही परिणाम झाला. सर्व गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून गाड्या सुमारे अर्धा तास उशिरा धावत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा