मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास खोळंबली


SHARE

मंगळवारी सकाळच्या वेळेतच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे चाकरमान्यांना ट्रॅकवरून चालत स्थानक गाठावं लागले. शिव आणि कुर्ला स्थानाकादरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल अर्धा तास खोळंबली. यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. तर धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली होती.


प्रवासी हैराण

ऐन गर्दीच्या वेळी सकाळी 7.15 च्या दरम्यान लोकल रखडल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. यामुळे स्थानाकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी लगेच त्या ठिकाणी धाव घेत बिघाड दुरुस्त केला. दरम्यान सकाळी 7.45 च्या सुमारास या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. मात्र सकाळी ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे ठप्प झाल्याने अनेक चाकरमान्यांना कामावर जायला उशीर झाला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या