• सीएसटीएमवर मोबाइल चार्जिंग पाॅईंट
SHARE

घरातून मोबाइलची बॅटरी फूल करून निघाल्यानंतर काही वेळातच मोबाइलची बॅटरी संपते आणि मग अनेकांची चांगलीच अडचण होते. लोकल-रेल्वेच्या प्रवासादरम्यान तर हा अनुभव अनेकांना येतो. आता मात्र रेल्वे-लोकलने प्रवास करणाऱ्यांची ही अडचण दूर होणार आहे. रेल्वे प्रशासनानं रेल्वे स्थानकांवर मोबाइल चार्जिंग पाॅईंट सुरू करण्याचा निर्णय घेत रेल्वे प्रवाशांना खूश केलं आहे.




प्रवाशांना फायदा

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरील विविध रेल्वे स्थानकांवर मोबाइल चार्जिंग पाॅईंट बसवण्यात येणार असल्याची माहिती लोहानी यांनी दिली. सद्यस्थितीत लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये प्रवाशांना चार्जिंग पाॅईंटची सोय उपलब्ध करून देण्यात येते. 



मोबाइल आणि लॅपटाॅप चार्जिंगसाठी या चार्जिंग पाॅईंटचा प्रवाशांना फायदा होतो. परंतु अशी सोय उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. अशा प्रवाशांना प्लॅटफाॅर्मवर असलेला हा चार्जिंग पाॅईंट उपयोगाचा ठरू शकतो.


चार्जिंग पाॅईंट कुठे?

तर, या प्रकल्पातील पहिलं मोबाइल चार्चिंग पाॅईंट सीएसटीएम स्थानकावरील फ्लॅटफाॅर्म क्रमांक ८ वर बसवण्यात आलं आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येनं प्रवाशी या मोबाइल चार्जिंग पाँईंटचा लाभ घेत असून रेल्वेच्या या निर्णयावर प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.



हेही वाचा-

रेल्वे ट्रॅकवरील कचरा उलचण्याची जबाबदारी महापालिकेची, रेल्वेनं केले हात वर

मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पाला 'गती'



संबंधित विषय
ताज्या बातम्या