Advertisement

रेल्वे ट्रॅकवरील कचरा उलचण्याची जबाबदारी महापालिकेची, रेल्वेनं केले हात वर

थोडा जरी पाऊस झाला, तरी ट्रॅकवर पाणी साचून रेल्वे सेवा विस्कळीत होते. असं असताना रेल्वे प्रशासनानं ट्रॅकवरील कचऱ्याच्या साफसफाईवर भर देण्याएेवजी थेट मुंबई महापालिकेकडे बोट दाखवत हात वर केले आहेत.

रेल्वे ट्रॅकवरील कचरा उलचण्याची जबाबदारी महापालिकेची, रेल्वेनं केले हात वर
SHARES

पावसाळ्यात ट्रॅकवर पाणी साचून रेल्वे सेवेला ब्रेक बसू नये यासाठी रेल्वे प्रशासनानं रेल्वे ट्रॅकच्या साफसफाईचं काम पावसाळ्याआधी पूर्ण करणं गरजेचं असतं. पण हे काम वेळेत होत नसल्यानं थोडा जरी पाऊस झाला, तरी ट्रॅकवर पाणी साचून रेल्वे सेवा विस्कळीत होते. असं असताना रेल्वे प्रशासनानं ट्रॅकवरील कचऱ्याच्या साफसफाईवर भर देण्याएेवजी थेट मुंबई महापालिकेकडे बोट दाखवत हात वर केले आहेत.


काय म्हणाले लोहानी?

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी सोमवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत रेल्वेच्या कामांचा आढावा घेताना रेल्वे ट्रॅकवरील कचऱ्यांमुळे बऱ्याच अडचणी येत असल्याचं सांगितलं. ''हा कचरा उचलण्याची जबाबदारी कुणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. महापालिकेनं त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पा़डली तर बऱ्याच समस्या सुटतील'' असं म्हणत त्यांनी थेट पालिकेलाच जबाबदार धरलं. त्यामुळे ट्रॅकवरील कचऱ्यावरून महापालिका आणि रेल्वे प्रशासनानत जुंपण्याची शक्यता आहे.



पहिल्याच पावसात ट्रॅकवर पाणी

पहिल्या पावसापासून आतापर्यंत प्रत्येक पावसात रेल्वेसेवा विस्कळीत होत आहे. तर थोड्याशा पावसातही मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील अनेक रेल्वे ट्रॅक पाण्याखाली जात आहेत. रेल्वे ट्रॅकसह रेल्वे ट्रॅकला लागून असलेल्या नाल्यांची साफसफाई होत नसल्यानं आणि कचरा उचलला जात नसल्यानं ट्रॅकवर पाणी साचून रेल्वे सेवा विस्कळीत होत आहे.


९० टक्के गाड्या वेळेवर?

लोहानी यांनी एकीकडे कचऱ्यासाठी महापालिकेकडे बोट दाखवलं आहे. तर, दुसरीकडं मध्य रेल्वेच्या ९० टक्के गाड्या वेळेवर धावत असल्याचं अजब विधान मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी केलं आहे. मध्य रेल्वेवर रोजच्या रोज काही ना काही अडचणी निर्माण होतात नि मध्य रेल्वे सेवा विस्कळीत होते. असं असताना ९० टक्के गाड्या वेळेवर धावतात या महाव्यवस्थापकांच्या विधानामुळं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.



हेही वाचा-

वांद्रे टर्मिनस ते जबलपूरदरम्यान धावणार विशेष सुपरफास्ट गाडी

कल्व्हर्टच्या सुधारणेसाठीही रेल्वेला हवेत पालिकेकडून पैसे



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा