Advertisement

महिला प्रवाशाचा जीव वाचवणाऱ्या मोटरमनचा सत्कार


महिला प्रवाशाचा जीव वाचवणाऱ्या मोटरमनचा सत्कार
SHARES

मध्य रेल्वेच्या माटुंगा-सायन स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या महिलेचा लोकल थांबूवन जीव वाचवणाऱ्या मोटरमनचा रेल्वेतर्फे सत्कार करण्यात आला. आर. एस. तिवारी असं या मोटरमनचं नाव आहे.


कधी घडली घटना?

मोटरमन आर. एस. तिवारी रविवार ३० डिसेंबर रोजी सीएसटी-ठाणे लोकल चालवत असताना रात्री ८ वाजेच्या सुमारास बेशुद्ध अवस्थेतील एक महिला रुळांवर पडलेली दिसली. माटुंगा आणि शीव स्थानकांच्या दरम्यान डाऊन आणि अप मार्गाच्यामध्ये योशिता महाजन ही बेशुद्ध अवस्थेत पडली होती. त्यानंतर त्यांनी तातडीनं इमर्जन्सी ब्रेक दाबला आणि लोकलमधून खाली उतरून त्यांना मदत केली.


रेल्वेकडून सत्कार

यानंतर, तिवारी, गार्ड एस. डब्ल्यू. बोरकर आणि जीआरपीचे कॉन्स्टेबल शेख यांनी योशिता यांना उपचारासाठी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. वेळीच मदत मिळाल्यामुळे या महिलेचे प्राण वाचले. या कार्यामुळे मोटरमन तिवारी यांचा मध्य रेल्वेतर्फे ५००० हजार रुपये आणि प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.



हेही वाचा-

शताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवासी घेताहेत वाचनाची ‘अनुभूती’

एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरक एकरकमी मिळणार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा