Advertisement

मध्य रेल्वेचा विक्रम, एप्रिल महिन्यात फुकट्यांकडून ११ कोटी दंड वसूल


मध्य रेल्वेचा विक्रम, एप्रिल महिन्यात फुकट्यांकडून ११ कोटी दंड वसूल
SHARES

मध्य रेल्वेने चालू वर्षात म्हणजेच एप्रिल २൦१८ मध्ये फुकट्या प्रवाशांकडून विक्रमी दंड वसूल करत त्यांना चांगलाच दणका दिला आहे.


इतका दंड वसूल

मध्य रेल्वेने फक्त ३൦ दिवसांत ११ कोटी २४ लाख ४८ हजार ७९३ रुपये दंड फुकट्या प्रवाशांकडून वसूल केला आहे. तर, गेल्यावर्षीच्या एप्रिल महिन्यात ८ कोटी ५९ लाख ६४ हजार ७६൦ रुपये दंड वसूल करण्यात आला होता. शिवाय, ही रक्कम एका महिन्यात विक्रमी असल्याचं मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

यंदा एप्रिल महिन्यात १ लाख ९४ हजार ८२२ प्रवाशांकडून ११ कोटी २४ लाख ४८ हजार ७९३ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात १ लाख ५४ हजार ६७२ प्रवाशांकडून ८ कोटी ५९ लाख ६४ हजार ७६० रुपयांची वसुली केली होती.

ही आतापर्यंतची रेकॉर्डब्रेक कामगिरी असल्याचं म्हणत प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा, असं आवाहन मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन यांनी केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा