Advertisement

Coronavirus update: रेल्वेने एसी डब्यातले पडदे, ब्लँकेट्स काढले


Coronavirus update:  रेल्वेने एसी डब्यातले पडदे, ब्लँकेट्स काढले
SHARES

कोरोनाचा धसक्याने आता रेल्वेने एसी डब्यातले पडदे, ब्लँकेट्स काढण्याचा निर्णय घेतला आहे.  पडदे, ब्लँकेट्स रोज धुतले जात नाहीत. त्यामुळे  प्रवाशांनी या गोष्टी स्वतःच्या स्वतः आणाव्यात, रेल्वेतर्फे पुरवण्यात येणार नाहीत असं रेल्वेने स्पष्ट केलं आहे. 

 कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी रेल्वेकडून महत्त्वाची पावलं उचलली आहेत. यासाठी  मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये जंतूनाशक फवारणी केली जात आहे.डबे निर्जंतुक करण्यासाठी  मध्य रेल्वे काचा, हँडरेस्ट, हँडल्स, उभं राहण्याची जागा, सीट्स, लोकलच्या आतले आणि बाहेरचे पृष्ठभाग साफ करत आहे. 

यार्डात उभ्या असलेल्या गाड्यांमध्ये जंतूनाशकांची फवारणी केली जात आहे. रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये कोरोनाविषयी काळजी घेण्याबाबतची पत्रकही लावण्यात आली आहेत. तसंच रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये स्पीकरवर कोरोनाविषयीच्या जनजागृतीसाठी माहितीपूर्वक संदेशही देण्यात येत आहे.

पश्चिम रेल्वेने 'तुम पास आए, यूं मुस्कुराए, हाथ मिलाए तो वायरस फैलाए' अशा आशयाचं ट्विट करत करोनासंबंधी जागरुकेसाठी, काळजी घेण्याचं सांगितलं आहे.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा